घरठाणेअंबरनाथ शिवमंदिर आर्ट फेस्टिवलमध्ये पुन्हा चेंगराचेंगरी

अंबरनाथ शिवमंदिर आर्ट फेस्टिवलमध्ये पुन्हा चेंगराचेंगरी

Subscribe

दोन महिला जखमी

अंबरनाथ । अंबरनाथमध्ये रविवारी शिवमंदिर आर्ट फेस्टिवलचा शेवटचा दिवस असताना या महोत्सवात तुफान गर्दी झाली. त्यामुळे झालेल्या चेंगराचेंगरीत दोन महिला जबर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात रवाना केले आहे.

आर्ट फेस्टीवलचा रविवारी शेवटचा दिवस होता. या दिवशी गायक सोनू निगम यांचा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच मोठी गर्दी उसळल्याने पोलिसांची नियंत्रण ठेवताना मोठी दमछाक झाली. पोलिसांना हलका लाठीमार करावा लागला. प्रेक्षकांना मोठ्या प्रमाणात पासेस देण्यात आल्याने लोकांनी प्रवेशद्वाराजवळच मोठी गर्दी केली होती. त्यामुळे द्वाराचा मार्ग जवळपास बंद झाला होता. रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे या फेस्टिवलचे प्रमुख पाहुणे होते. त्यांच्या समर्थकांनीही फेस्टिवलच्या ठिकाणी गर्दी केल्याने लोकांना चेंगराचेंगरीचा सामना करावा लागला. मागील वर्षीही फेस्टीव्हलमध्ये चेंगराचेंगरीची घटना घडली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -