घरठाणेपोटातून बांबू आरपार घुसलेल्या युवकाला 'आयुष' ने दिले नवे 'आयुष्य '

पोटातून बांबू आरपार घुसलेल्या युवकाला ‘आयुष’ ने दिले नवे ‘आयुष्य ‘

Subscribe

कोमात गेलेला रुग्ण शुद्धीवर

बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या मजल्यावरून बिगारी म्हणून कामकाज करणाऱ्या युवकाचा तोल गेल्याने तो खाली कोसळला. इमारती खाली उभे केलेल्या टोकदार बांबूवर पडल्याने कुशीत बांबू आरपार घुसत लिव्हर, फुफ्फुस ,किडनी व आतड्यांना इजा होत मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाला. मात्र अशा अवस्थेत कल्याण मधील आयुष रुग्णालयातील वैद्यकीय पथकाने प्रयत्नांची पराकाष्टा करीत मृत्यूच्या दाढेतून त्या युवकाला बाहेर काढीत जीवनदान दिले. तरीकुल आलम असे या 21 वर्षीय बिगारी तरुणाचे नाव आहे.कल्याण मधील एका बांधकामाच्या साइटवर मजूर म्हणून रोजंदारीवर काम करीत होता. अचानक इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून तो कोसळला. इमारतीखाली टोकदार बांबू वर पडल्याने कुशीला भेदत बांबू आरपार निघाला. जवळच असलेल्या आयुष रुग्णालयात त्याला उपचारार्थ दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासले असता पल्स , बी पी काहीच लागत नसल्याने त्याला अतिदक्षता विभागात उपचारार्थ दाखल करीत कृत्रिम श्र्वासोश्वासावर ठेवण्यात आले. लिव्हर, फुफ्फुस, आतडे व किडनीला जबर इजा झाल्याने रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात झाला होता. शस्त्रक्रिया करण्यापूर्वी त्याला चार ते पाच बाटल्या रक्त चढवण्यात आले.

शस्त्रक्रिया करताना अत्यंत जोखीम पत्करून लिव्हरचा होणारा रक्तस्त्राव थांबविला, किडनी डॅमेज झाल्याने तिला टाके मारण्यात येऊन तो रक्तस्त्राव थांबवण्यात आला, आतडी शिवण्यात आली. फुफुसाला इजा झाली होती त्यातील गोठलेले रक्त काढून ट्यूबा टाकण्यात आल्या. चौथ्या माळ्यावरून पडल्याने बिगारी कामगाराच्या डोक्यालाही मार लागला होता. शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतरही तो चार दिवस कोमामध्ये होता. मात्र आयुषची वैद्यकीय सेवा सतत कार्यरत होती. वैद्यकीय परिणाम रुग्णाला जाणवू लागताच काही दिवसातच डावा आणि नंतर उजवा हात रुग्ण हलवू लागला ,नंतर दोन्ही पाय कालांतराने हलवून शस्त्रक्रियेला त्याने यशस्वी केले. रुग्ण आता बोलू लागला आहे.

- Advertisement -

जेवणासाठी लावलेली नळी काढण्यात आली. त्यामुळे तो स्वतः जेवण करू लागला आहे. हा रुग्ण उपचारार्थ आणला गेला होता त्यावेळेस तो शेवटची घटका मोजत होता. मात्र आयुष रुग्णालयातील डॉक्टर शशांक पाटील, डॉक्टर अनिकेत वाळिंबे ,डॉक्टर राजेश राजू यांनी रुग्णावर सतत सात तास शस्त्रक्रिया यशस्वी केली. या कामी डॉक्टर अमित बोटकोंढले तसेच डॉक्टर विठ्ठल यांनी अत्यंत मोलाचे अतिदक्षता विभागात रुग्णांवर उपचार केले. सामाजिक जाणीवेतून आयुष रुग्णालयातील या डॉक्टरांच्या टीमने कोमा मध्ये गेलेल्या रुग्णाला जीवनदान दिल्याने कल्याणकर नागरिकांनी या वैद्यकीय सेवेचे विशेष कौतुक केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -