घरठाणेउल्हासनगरच्या 11 मुख्य रस्त्यांचे काँक्रिटिकरण

उल्हासनगरच्या 11 मुख्य रस्त्यांचे काँक्रिटिकरण

Subscribe

ट्रान्झिट कॅम्प उभारण्यासाठी शासनाकडे 237 कोटी रुपयांची मागणी करणारा प्रस्ताव महासभेत

उल्हासनगर शहरातील प्रमुख 11 रस्त्यांचे काँक्रिटिकरण आणि ट्रान्झिट कॅम्प उभारण्यासाठी शासनाकडे 237 कोटी रुपयांची मागणी करणारा प्रस्ताव महासभेत आणला आहे. विशेष म्हणजे या रस्त्यांपैकी तीन रस्ते हे काँक्रिटचे असून सुस्थितीत आहेत. उल्हासनगर महानगरपालिकेतर्फे एकात्मिक विकास रस्ते योजनेअंतर्गत ३३ रस्त्यांचे अंदाजे २० वर्षापूर्वी डांबरीकरण व रुंदीकरण केले होते. त्यानंतर दरवर्षी रस्त्यांवरील खड्डे पावसाळयापूर्वी, पावसाळयानंतर भरण्यात येतात. त्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या प्रस्तावात शहरातील प्रमुख 11 रस्त्यांसाठी 200 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे.

या रस्त्यांचे काँक्रिटीकरण होणार
यामध्ये उल्हासनगर कॅम्प १ मधील नाका क्र.१० ते चाली वेफर मार्ग गुलशन नगर, फिश मार्केट ते मुरबाड नाका,  उल्हासनगर कॅम्प २ मधील फॉलवर लाईन ते नेहरु चौक, फिश मार्केट ते आशाराम बापू आश्रम वाया राम मालिश, उल्हासनगर कॅम्प ३ मधील आर.ओ.बी. ते ओ.टी.चौक मार्गे पिंटो पार्क, उल्हासनगर ४ मधील श्रीराम चौक ते हनुमान मंदीर, ओ.टी. चौक ते व्हीनस चौक, हिरापुरी चौक ते एस.एस.टी.कॉलेज, सोनारा चौक ते कोयंडे पुतळा,  उल्हासनगर कॅम्प 5 मधील देना बँक ते फीश मार्केट, लालचक्की चौक ते कैलाश कॉलनी पर्यंतच्या रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे.

शहराला मिळणार ट्रान्झिट कॅम्प
उल्हासनगर शहरातील धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींचे प्रमाण जास्त आहे. या इमारतींची बांधकामे निकृष्ठ दर्जाची झाली असल्याने इमारती कोसळण्याच्या घटना घडत असतात. इमारती कोसळल्यामुळे इमारतींमधील विस्थापित होणा-या रहिवाश्यांसाठी उल्हासनगर शहरात पर्यायी व्यवस्था नाही. त्यामुळे या रहिवाशांची अत्यंत गैरसोय होते. त्यामुळे शहरात ट्रान्झीट कॅम्प असणे अत्यंत आवश्यक झाले आहे. त्यामुळे उल्हासनगर कॅम्प १ मधील वाल्मीकी नगर जवळ ट्रांन्झीट कॅम्प उभारणेचे प्रशासनातर्फे निश्चित केले आहे. हे ट्रांन्झीट कॅम्प उभारण्याकरीता शासनाकडे 25 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -