घरठाणेठाण्यात कोविड चाचण्या तिप्पट वेगात

ठाण्यात कोविड चाचण्या तिप्पट वेगात

Subscribe

प्रतीदिन १००० जणांच्या चाचणीचे टार्गेट, ठामपा आरोग्य यंत्रणा सतर्क

देशाच्या काही राज्यात जे एन-वन या ओमायक्रॉन कोविड १९ विषाणूच्या उपप्रकाराचे रुग्ण आढळून येत असल्याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोग्य विभाग व संबंधित सर्व यंत्रणांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ठाण्यातही ६ कोविड रुग्ण आढळल्याने प्रतिदिन १००० पर्यंत चाचण्या कराव्यात. या चाचण्यामध्ये आरटीपीसीआर व अँटीजेन टेस्ट यांचे प्रमाण हे ६० : ४० असे राखण्यात यावे, आरटीपीसीआरच्या चाचण्या जास्तीत जास्त करण्यावर भर देण्याचे निर्देश ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी शुक्रवारी बैठकीत दिल्या.

मागील काही दिवसांपासून जगभरामध्ये कोविड जे एन-वन या ओमायक्रॉनचे बाधीत रुग्ण आढळून येत आहेत, या पार्श्वभूमीवर रुग्णालयात उपचारासाठी येणार्‍या रुग्णांची कोविडची चाचणी करण्यात यावी. महापालिका कार्यक्षेत्रात यापूर्वी दैनंदिन ३५० चाचण्या करण्यात येत आहेत, यामध्ये वाढ करुन प्रतिदिन १००० पर्यंत चाचण्या करण्यात याव्यात.यात आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या वाढविणे, सर्व आरोग्य केंद्रातील तापाच्या ओपीडीमध्ये येणार्‍या नागरिकांची कोविडची चाचणी करावी. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात बेडची संख्या वाढविण्यात यावी. तसेच सर्व नागरी आरोग्य केंद्र व छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील ओपीडीमधील सर्व रुग्णांची कोविड चाचणी अनिवार्य करण्यात यावी. त्याच पध्दतीने रेल्वे स्टेशन, मार्केट परिसर या ठिकाणी रँडम टेस्टींग करण्यात याव्यात. आदी सूचना महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -