घरक्राइमCrime In Thane : प्रिया सिंह प्रकणाची SIT चौकशी; अश्वजित गायकवाड अटकेत

Crime In Thane : प्रिया सिंह प्रकणाची SIT चौकशी; अश्वजित गायकवाड अटकेत

Subscribe

 या तिघांविरोधात कासारवडवली पोलिसांत कलम 279, 338, 323, 504, 34 भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला असून अधिक तपासासाठी झोन-5चे पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांच्या नेतृत्वात विशेष तपास पथक (एसआयटी) नेमण्यात आल्याची माहिती ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांनी दिली.

ठाणे : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड यांचा मुलगा अश्वजित गायकवाड याने मारहाण करीत कारची धडक देत गंभीर जखमी केल्याचा आरोप त्याची प्रेयसी प्रिया सिंह (26) हिने दोन दिवसांपूर्वी केला होता. मात्र ठाण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाच्या दबावाखाली तक्रार नोंदवण्यास नकार देणार्‍या ठाणे पोलिसांनी अखेर अश्वजित गायकवाडसह रोमिल पाटील आणि सागर शेडगे या तिघांना रविवारी रात्री अटक केली. सोबतच दोन चारचाकी वाहने जप्त केली. प्रिया सिंहने आपल्याला न्याय मिळावा अशी मागणी करत सोशल मीडियावर पोस्ट टाकली होती. या पोस्टनंतर सोशल मीडियातूनही अश्वजितला अटक व्हावी म्हणून पोलिसांवरही दबाव वाढला होता. (Crime In Thane SIT investigation of Priya Singh case in Thane)

या तिघांविरोधात कासारवडवली पोलिसांत कलम 279, 338, 323, 504, 34 भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला असून अधिक तपासासाठी झोन-5चे पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांच्या नेतृत्वात विशेष तपास पथक (एसआयटी) नेमण्यात आल्याची माहिती ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांनी दिली.

- Advertisement -

घोडबंदर येथील वाघबीळ भागात प्रिया राहत असून ती सलूनचा व्यवसाय करते. प्रिया आणि अश्वजित यांच्यात जवळपास 4 वर्षे संबंध असल्याचे सांगितले जाते. प्रियावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांनी स्वाक्षरीसाठी दबाव टाकल्याचा आरोप तिने केला आहे. राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली असून ठाण्याचे जिल्हा दंडाधिकारी आणि पोलीस आयुक्त यांच्याकडून तातडीने अहवाल मागवला असल्याचे रूपाली चाकणकर यांनी सांगितले आहे.

अश्वजीत हे भाजप युवा मोर्चाचे अध्यक्षही आहेत. प्रियाने आपले प्रकरण सोशल मीडियावर टाकत पोलिसांच्या कार्यशैलीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर अश्वजितला अटक करण्यासाठीचा पोलिसांवरील दबाव वाढला होता. आता तिघांच्या अटकेनंतर आता या प्रकरणी फॉरेन्सिक पुरावेही गोळा केले जात आहेत. समोर आलेल्या तथ्यांच्या आधारे आरोपींविरुद्ध इतर कलमेही जोडण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

- Advertisement -

हेही वाचा : PHOTO : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ऑन द फिल्ड; नागपूर येथील स्फोटाचा घेतला आढावा

प्रिया सिंहने रविवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, अश्वजीतच्या सांगण्यावरून त्याच्या ड्रायव्हरने गाडीचा वेग वाढवला आणि मला धडक दिली, त्यामुळे मी जमिनीवर पडले. गाडीचे मागचे डावे चाक माझ्या उजव्या पायावरून गेले. 20-30 मीटर फरफटत गेल्यानंतर त्यांनी गाडी थांबवली तेव्हा मी मदतीसाठी आरडाओरड केली. त्यावेळी ते मला एकटीला रस्त्यावर टाकून पळून गेले. मी जवळपास 30 मिनिटे फोन किंवा कोणत्याही मदतीशिवाय रस्त्यावर पडून होते. एका वाटसरूने मला पाहिले आणि स्थानिक पोलिसांना माहिती दिली.

हेही वाचा : Pravin Darekar : सहकारात काम करण्याची इच्छा असलेला निश्चितच पुढे जातो- प्रवीण दरेकर

माझा पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांवर प्रचंड विश्वास आहे. मला फक्त न्याय हवा आहे. काल रात्री काही पोलीस माझ्याकडे आले. मला कागदावर सही करण्यासाठी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. माझ्याकडे वकील नसल्याने मी नकार दिला. तसेच माझ्या कुटुंबातील कोणीही नव्हते. ते माझ्यावर दबाव आणत होते. मी कागदावर सही केली नाही तेव्हा ते रागावले आणि निघून गेले.

घटनेतील आरोपीने जाणीवपूर्वक तरुणीला मारण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी जो गुन्हा दाखल केला आहे तो चुकीचा आहे. या प्रकरणात लक्ष दुसरीकडे वळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. आरोपी गायकवाडच्या ठिकाणी दुसरे कुणी असते तर त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक झाली असती. पीडितेवर दबाव आणला जातोय. हिवाळी अधिवेशनात हा विषय उचलून धरू.

-अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -