घरठाणे...राऊतांना सांगू नका ते कंपाउंडर पाठवतील

…राऊतांना सांगू नका ते कंपाउंडर पाठवतील

Subscribe

शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांची आदित्य ठाकरेंवर टीका

जर अदित्य ठाकरेंच्या पोटात दुखत असेल तर त्यांनी डॉक्टर शोधावे. पण, याबाबत खासदार संजय राऊतांना सांगू नये. नाहीतर ते एखादे कंपाउंडर पाठवतील. तसेच तुम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावर अशीच टीका करत राहिला तर जी दशा झाली त्यापेक्षा जास्त दुर्दशा होईल, अशा शब्दात शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी सोमवारी ठाण्यात पत्रकार परिषद घेत, समाचार घेतला. तसेच मातोश्री आणि खोके हे वेगळे आहे का? असा सवाल केला.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी वरळीतील जांबोरी मैदानात रविवारी जाहीर सभा घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टिका केली होती. या टिकेला शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी सोमवारी ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले. तुम्ही काचेच्या घरात राहत असल्यामुळे दुसर्‍यांच्या घरावर दगड मारण्याचा प्रयत्न करु नका. अन्यथा तुम्ही उध्वस्त व्हाल. आम्ही तोंड उघडले तर तुम्हाला महाराष्ट्रात फिरताना तोंड दाखवायला जागा उरणार नाही, असा इशारा ही म्हस्के यांनी दिला. मातोश्रीवर चंदू आणि नंदू कोण आहेत, हे आम्हाला सांगायला लावू नका आणि मातोश्रीवर कोण पैसे गोळा करत होते आणि कोणी किती खोके दिलेत, याची माहितीही आमच्याकडे आहे. त्यामुळे तुम्ही आमच्यावर आरोप करू नका, आम्ही जर तोंड उघडले तर, तुम्हाला पळता भुई थोडी होईल. असेही म्हस्के म्हणाले.
पुढे बोलताना, मुंबई महापालिकेतून जो गडगंज पैसे आणि खोके जमा केले आहेत. त्यातूनच या सर्व गोष्टी केल्या आहेत. मुंबई महापालिकेच्या वास्तुचा प्रत्येक दगड आणि भिंती तुम्हा विचारत आहे की, कुठे नेऊन ठेवला मुंबई महापालिकेचा पैसा, अशी टिकाही त्यांनी यावेळी केली.

- Advertisement -

भास्कर जाधव तुम्ही गद्दारी केली नाही का?
भास्कर जाधव तुम्ही गद्दारी केली नाही का? असा सवाल म्हस्के यांनी केला. जाधव आमच्याशी चर्चा करतात, तुमच्याकडे येतो सांगतात. फक्त ते राणे आणि उदय सामंत यांचे काय ते बघा, असेही म्हस्के म्हणाले, जाधव
संपर्कात असल्याचे म्हस्के म्हणाले. जाधव हे ठाण्यात येऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमच्यावर टिका करतात, ते केवळ मातोश्रीवर विश्वास दाखविण्यासाठीच. आम्ही तुमची प्रकरणे बाहेर काढली तर, दुसर्‍यादिवशी जेलमध्ये जाल, त्यामुळे आरोप करायचा प्रयत्न करु नका, आपला फुगा फुटेल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

सावंत यांनी कायम ठाण्याचा दुस्वास केला
अरविंद सावंत यांनी कायम ठाण्याचा दुस्वास केला. त्यांची मुख्यमंत्री आणि ठाण्यातील शिवसैनिकांबद्दल बोलण्याची योग्यता नाही. तर, आमचे आनंद आश्रम हे अनाथाचे आश्रम आहे, असे म्हस्के म्हणाले.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -