घरठाणेसरपंचपदाची आरक्षण सोडत 14 डिसेंबरला

सरपंचपदाची आरक्षण सोडत 14 डिसेंबरला

Subscribe

ठाण्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक

सन 2020-25 या कालावधीत सार्वत्रिक निवडणुका होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी सोमवार १४ डिसेंबर २०२० रोजी सकाळी ११ वाजता सरपंच पदाच्या आरक्षण सोडत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला आहे. कोविड -19 विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून निश्चित केलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार दक्षता घेणेबाबत दिलेल्या निर्देशांचे पालन करण्यात येणार आहे.

आरक्षण सोडत कार्यक्रमास उपस्थित राहणाऱ्या सर्व अधिकारी,कर्मचारी, पदाधिकारी वा ग्रामस्थ यांनी मास्क परिधान करणे बंधनकारक राहिल. या ठिकाणी साबण, पाणी, हॅन्ड सॅनिटायझर उपलब्ध करुन देण्यात आला आहे. बैठक व्यवस्थेमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा चा वापर करावा.आरक्षण सोडत कार्यक्रमासाठी उपस्थितांचे तापमान तपासणी करुनच कार्यस्थळी प्रवेश देण्यात येणार आहे. कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र शासन,राज्य शासन आणि या कार्यालयाचे वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सुचना, आदेशांचे तंतोतंत पालन करावे. असे आवाहन ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले आहे.

- Advertisement -

कोरोनाकाळानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना महत्व प्राप्त झाले आहे. ठाणे जिल्हा प्रशासन या निवडणुकांच्या तयारीला लागले असून राजकीय पक्षांचीही मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. कोरोना काळातील रखडलेली विकासकामेही या निवडणुकीनंतर मार्गी लागणार आहेत. त्यामुळे ठाण्यातील ग्रामीण भागात या निवडणुकींची उत्सुकता आतापासून आहे. ठाणे तालुका क्षेत्रातील ग्रामीण भागातील रस्ते, बांधणी, पायाभूत सुविधा, वाहतूक, आरोग्य आदी सर्वच भागातील कामे मार्गी लागण्यासाठी या निवडणुका महत्वाच्या आहेत. आरक्षण सोडतीनंतर प्रभागरचनेत बदल होण्याची शक्यता आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुका या राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील निवडणुकांचा पाया मानल्या जातात. ग्रामपंचायतींच्या निवडणुकीतील राजकारण हे स्थानिक पातळीवरील असल्याने राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी केली जाते. यंदाच्या निवडणुकांवर कोरोनाचे सावट असल्यामुळे संपूर्ण निवडणूक कार्यक्रम हा सोशल डिस्टन्सिंग, सरकारी निर्देशानुसार होणार आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -