घरठाणेस्मार्ट सिटीचा दुसर्‍या टप्प्यात नागरिकांची मते नोंदवण्याची प्रक्रिया सुरु

स्मार्ट सिटीचा दुसर्‍या टप्प्यात नागरिकांची मते नोंदवण्याची प्रक्रिया सुरु

Subscribe

शहराबद्दल आपले मत नोंदविण्याचे आवाहन

उल्हासनगर । केंद्र सरकारच्या आवास आणि नागरी मंत्रालयात तर्फे स्मार्ट सिटीचा दुसरा टप्पा सुरु करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत नागरिकांना आपल्याला शहराबद्दल आपले मत नोंदविण्याचे आवाहन मनपाच्या वतीने करण्यात आले असल्याची माहिती मनपा उपायुक्त सुभाष जाधव यांनी उल्हासनगर वासियांना केले.

देशात 260 स्मार्ट सिटीच्या दुसर्‍या टप्प्याचे सर्वेक्षण सुरू झाले असून लोकांचे आपल्याला शहरात असणार्‍या सोयी सुविधा, पर्यावरण आणि पिण्याचे पानी समवेत वेगवेगळे 17 प्रश्न नागरिकांना विचारण्यात येत आहेत. एका गुगल शिटच्या माध्यमातून नागरिक या सर्वेक्षणात आपला सहभाग नोंदवू शकणार आहेत. नवी मुंबई, नाशिक, पुणे सोबत उल्हासनगर महानगरपालिकेचा देखील यात समावेश करण्यात आले असल्याची माहिती जाधव यांनी दिली आहे.

- Advertisement -

आपले शहर कितपत राहण्यायोग्य आहे. याबाबत केंद्राच्यावतीने सिटीझन पर्सेप्शन सर्वेक्षण केले जात आहे. त्यानुसार उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रात सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे. नागरिकांना या सर्वेक्षणात सहभाग घेऊन शहरा बद्दल आपले मत व्यक्त करण्याची संधी प्राप्त झाली आहे.

सोमवारी आयुक्त अजीज शेख अध्यक्षतेखाली मुख्यालयात विविध शिक्षक, मुख्याध्यापक आणि शैक्षणिक संस्थांच्या प्रतिनिधींची ऑनलाईन बैठक आयोजित करण्यात आली होती. उल्हासनगर महानगरपालिकाही या स्पर्धेत सहभागी झाली आहे. या अनुषंगाने महापालिका आयुक्तांनी स्पर्धेची माहिती देण्याकरता उल्हासनगर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील रोटरी क्लब, व्यापारी संघटना, ज्येष्ठ नागरिक संघटना, विद्यार्थी संघटना अशा विविध संस्था आणि संघटनांच्या अध्यक्ष, सचिव, सदस्य यांना या सर्वेक्षणात सहभागी होण्यासाठी आवाहन केले आहे. या कामाकरता उपायुक्त सुभाष जाधव आणि अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर हे नियोजन आणि समन्वयन करत आहेत. नागरिकांनी या वेबसाईट लिंक https://eol2022.org/CitizenFeedback%2c महानगरपालिका कोड
802791 या संकेत स्थळावर जाऊन आपले मत व्यक्त करू शकतात अशी माहिती जाधव यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -