घरठाणेटिटवाळा, शहाड रेल्वेस्थानकांचा अमृत भारत स्टेशनमध्ये समावेश

टिटवाळा, शहाड रेल्वेस्थानकांचा अमृत भारत स्टेशनमध्ये समावेश

Subscribe

कपिल पाटील यांच्या उपस्थितीत सोमवारी कार्यक्रम

भिवंडी । रेल्वे मंत्रालयाच्या अमृत भारत स्टेशन योजनेमध्ये भिवंडी लोकसभा मतदारसंघातील टिटवाळा आणि शहाड रेल्वे स्थानकांचा समावेश झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रेल्वे स्थानकांतील कामांचे भूमिपूजन होणार आहे. तर टिटवाळा रेल्वे स्थानकाबाहेर होणार्‍या कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ केला जाईल. या योजनेतून टिटवाळा रेल्वे स्थानकात 25 कोटी 78 लाख व शहाड स्थानकात 15 कोटी 47 लाखांची कामे केली जाणार आहेत. अमृत भारत स्टेशन योजनेतून देशभरातील 553 रेल्वे स्थानकांचा विकास केला जाणार आहे. सुमारे 1 हजार 500 रेल्वे उड्डाणपूल आणि अंडरपासचे भूमिपूजन व लोकार्पण केले जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी दुपारी 12.30 वाजता ऑनलाईन पद्धतीने भूमिपूजन केले जाईल. तर स्थानिक स्तरावर टिटवाळा रेल्वेस्थानकाबाहेर होणार्‍या कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते शुभारंभ होईल.

अमृत भारत स्टेशन योजनेत टिटवाळा आणि शहाड रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. तर कल्याण-इगतपुरी मार्गावरील रेल्वे अंडरपास क्र. 53 व क्र. 76, खडवली ते वासिंद दरम्यान अंडरपास क्रमांक 59 यांचे लोकार्पण होईल. तर कल्याण-इगतपुरी मार्गावर रेल्वे उड्डाणपूल क्रमांक 55 आणि क्रमांक 65 यांचे भूमिपूजन केले जाणार आहे.
टिटवाळा रेल्वे स्थानकात कल्याणच्या दिशेने सहा मीटरचा नवा रेल्वे पादचारी पूल, रेल्वे स्टेशनची नवी इमारत व तिकिट खिडकी, प्लॅटफॉर्मवर एक्सलेटर आणि लिफ्ट, स्वच्छतागृहे, दिव्यांग प्रवाशांसाठी सुविधा, अद्ययावत घोषणा व्यवस्था, रेल्वे स्टेशन परिसरात व्हर्टिकल गार्डन, वेटींग रुममध्ये आसनव्यवस्था आदी कामे तर शहाड रेल्वे स्थानकात स्टेशनची नवी इमारत व तिकिट खिडकी, एक्सलेटर आणि लिफ्ट, अद्ययावत घोषणा व्यवस्था, व्हर्टिकल गार्डन, नवी आसनव्यवस्था आदी कामे केली जाणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -