घरठाणेकल्याण शहरात वाहतूक पोलिसांची संख्या वाढवा

कल्याण शहरात वाहतूक पोलिसांची संख्या वाढवा

Subscribe

कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

कल्याण शहर वाहतूक नियंत्रण विभागात सुव्यवस्थित वाहतुक नियमन करण्यासाठी अत्यल्प असलेली वाहतुक पोलिस कर्मचारी अधिकारी यांची संख्या आढावा घेऊन आवश्यकतेनुसार तात्काळ वाहतुक पोलिस कर्मचारी अधिकारी यांची संख्याबळ वाढवुन नेमणूक करणे व वाहतुक नियमन साधनसामुग्री उपलब्ध करुन देण्याची मागणी कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघांचे अध्यक्ष प्रणव पेणकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्र झपाट्याने विकसित होऊन वाढत आहे. यामुळे प्रचंड प्रमाणात लोकसंख्या व वाहनांची संख्या वाढत आहे. कल्याण मध्य रेल्वेचे सर्वाधिक प्रवासी गर्दीचे महत्वाचे रेल्वे स्टेशन जंक्शन आहे. अगणित वाहनांचे दळण वळण नित्यरोज होत असते. शेकडो परराज्यातील मेल एक्सप्रेस गाड्या नित्यरोज अप डाऊन करतात लाखो प्रवाशांची वर्दळ स्टेशन परिसरात असते. प्रचंड लोकसंख्या व अमाप वाढलेली वाहनांची संख्या यामुळे पायाभूत सुविधा व वाहतुक पोलिस यंत्रणा यांचेवर मोठ्या प्रमाणावर ताण येत आहे.

वाहतूक व्यवस्था व नियमन अत्यंत महत्त्वाचा घटक वाहतूक पोलिस कर्मचारी अधिकारी यांचे संख्याबळ मुंबई ठाणे इतर उपनगर यापेक्षा आवश्यकते नुसार फारच कमी आहे. कल्याण शहर वाहतूक उपशाखा पश्चिम उपलब्ध वाहतूक पोलीस कर्मचारी यांचे मध्ये फक्त प्रत्यक्ष बारा ते पंधरा वाहतूक पोलीस कर्मचारी वाहतूक नियमना करिता उपलब्ध होतात. अति महत्त्वाच्या व्यक्तींचे आगमन, राजकीय कार्यक्रम, सण उत्सव बंदोबस्त , कर्मचारी साप्ताहिक सुट्टी, कमी वाहतूक पोलिस कर्मचारी यामुळे वाहतूक पोलिसांवर प्रचंड प्रमाणावर ताण येत आहे.

- Advertisement -

महापालिकेने काही प्रमाणात वाहतुक वाॅर्डन उपलब्ध करून दिले आहेत. परंतु वाहतूक वाॅर्डन प्राशिक्षित नसतात त्यांना प्रत्यक्षात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालक यांच्यावर कारवाई करण्याचा अधिकार नाही. त्यामुळे वाॅर्डनचा प्रभाव पडत नाही. वास्तविक सुरळीत सुरक्षित वाहतूक व्यवस्था व वाहतुक नियमन या करीता शहरात पुरेसे वाहतूक पोलिस कर्मचारी बळ अत्यावश्यक आहे. कल्याण शहर वाहतूक नियंत्रण कार्यालय वास्तू अत्यंत जुनाट व जिर्ण झालेले आहे. पावसाळ्यात कार्यालयाचे छप्पर गळते वाहतूक पोलिस कर्मचारी अधिकारी प्रतिकूल परिस्थितीत वाहतूक कार्यालयात काम करतात. कार्यालयात आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध नाही. वाहतूक पोलिसांना आवश्यक पुरेसे साधने, वाहतूक नियमन साधन सामुग्री उपलब्ध नाही, ही बाब गंभीर बाब आहे. कल्याण स्टेशन परिसरात स्मार्ट सिटी अंतर्गत सॅटीसचे काम सुरू आहे. स्टेशन परिसरात आणि प्रमुख मार्ग, चौकात अपुरे वाहतूक पोलिस संख्या बळ यामुळे वाहतूक नियमनाकरीता वाहतूक पोलीस उपलब्ध नसतात. वास्तविक स्टेशन परिसरात आणि प्रमुख चौकात सकाळी सात ते दुपारी दोन ते रात्री अकरा वाजेपर्यंत आणि स्टेशन परिसरात दिवस रात्र वाहतूक पोलीस उपलब्धता आवश्यक आहे. त्यामुळे लवकरात लवकर वाहतूक पोलिसांची संख्या वाढविण्याची मागणी पेणकर यांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -