घरठाणेकोरोनाच्या पार्श्वभूमीवर 'महाशिवरात्री उत्सव' साध्या पद्धतीने साजरा करण्याचे महापौर, आयुक्तांचे आवाहन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘महाशिवरात्री उत्सव’ साध्या पद्धतीने साजरा करण्याचे महापौर, आयुक्तांचे आवाहन

Subscribe

 संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणारा 'महाशिवरात्री उत्सव' यंदा कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता अत्यंत साधा पद्धतीने साजरा करून राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शन सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांनी केले आहे.

संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणारा ‘महाशिवरात्री उत्सव’ यंदा कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता अत्यंत साधा पद्धतीने साजरा करून राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शन सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांनी केले आहे. कोविड १९ च्या अनुषंगाने यावर्षी सर्व धर्मीय सण, उत्सव तसेच सर्व कार्यक्रम अतिशय साधेपणाने साजरे करण्यात येत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कमी झालेला नसून सध्या राज्यात तसेच मोठ्या शहरांमध्ये रूग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होत आहे. त्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करता या वर्षी ‘महाशिवरात्री उत्सव’ अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. यासाठी शासनाच्यावतीने मार्गदर्शन सुचना देखील जाहीर करण्यात आल्या आहेत.

महाशिवरात्री हा भारतातील पवित्र उत्सवांपैकी एक मोठा उत्सव मानला जातो . देशभरात हिंदू धर्मीय लोक महाशिवरात्री मोठ्या उत्साहाने साजरी करतात. महाराष्ट्रातील प्रमुख देवस्थानी तसेच इतर विविध ठिकाणी असलेल्या शिवमंदिरात दरवर्षी शिवभक्त दर्शनाकरीता मोठ्या प्रमाणात गर्दी करीत असतात. परंतू यावर्षी कोविड- १९ च्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता महाशिवरात्री उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने सर्व मंदिर विश्वस्त आणि व्यवस्थापक यांनी मंदिरात देवदर्शनासाठी गर्दी होणार नाही व सोशल डिस्टन्सिंगचे पालन होईल याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.

- Advertisement -

दरवर्षी महाशिवरात्रीच्या निमित्ताने शिवमंदिरात मोठया प्रमाणात पूजाअर्चा केली जाते व दर्शनासाठी अनेक भाविक त्याठिकाणी गर्दी करीत असतात. परंतू यावर्षी कोविड- १९ च्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता भाविकांनी घराबाहेर न पडता शक्यतो घरात राहूनच पूजाअर्चा करण्याचे आवाहन ठाणे महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
कोविड- १९ चा संसर्ग टाळण्यासाठी प्रत्येक शिवमंदिराच्या आतील बाजूस सोशल डिस्टन्सींगचे पालन होण्याच्या दृष्टीने एकावेळी फक्त ५० भाविक दर्शन घेतील, यादृष्टीने संबंधित विश्वस्त आणि व्यवस्थापक यांनी योग्य त्या उपाययोजना कराव्यात. तसेच मंदिर व्यवस्थापनाने आजूबाजूच्या परिसरात निर्जतुकीकरणाची व्यवस्था, सोशल डिस्टन्सिंग व स्वच्छतेचे नियमांचे पालन होईल याकडे विशेष लक्ष द्यावे.

महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिराच्या परिसरात हार व फुले विक्रेते यांची गर्दी होणार नाही तसेच सोशल डिस्टन्सींगच्या नियमांचे तंतोतंत पालन होईल याकडे मंदीराचे व्यवस्थापक व स्थानिक प्रशासन यांनी विशेष लक्ष द्यावे. दरम्यान प्रशासनाने मंडपाबाबत दिलेल्या नियमांना अनुसरूनच महाशिवरात्री उत्सवाच्या निमित्त मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावेत.
प्रत्यक्ष मंदिरात येऊन दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांनी स्वत: हून मास्कचा वापर व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, जेष्ठ नागरीक व लहान मुलांना मंदिरात दर्शनाकरीता आणू नये, महाशिवरात्री निमित्त शिवमंदिरातील व्यवस्थापक यांनी दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादी द्वारे उपलब्ध करून देण्याचे आवाहन देखील महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -