घरक्राइमएमडी पावडर विक्रीसाठी आलेली दुकली जेरबंद

एमडी पावडर विक्रीसाठी आलेली दुकली जेरबंद

Subscribe

एमडी पावडर,बंदूक,जिवंत काडतुसे, चॉपर जप्त, ठाणे गुन्हे शाखेची कामगिरी

ठाणे । एमडी पावडर हा अंमली पदार्थ विक्रीकरीता मुंब्र्यात आलेल्या अभिषेककुमार गुप्तेश्वर महतो (32) आणि विजय बहादुर मडे (20) या दिव्यातील दुकलीच्या ठाणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनीट 1 ने मुसक्या आवळल्या. तसेच त्यांच्याकडून तीन लाख 21 हजारांचा 107 ग्रॅम एमडी या अंमली पदार्थासह, 1 अग्निशस्त्र, 9 जीवंत काडतुसे आणि 3 चॉपर असा एकुण चार लाख 23 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. अभिषेक हा नुकताच 307 सारख्या गुन्हयात आठ वर्ष शिक्षा भोगून कारागृहातून बाहेर आलेला आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली.
मुंब्रा, वाय जंक्शन येथे दोघे एमडी हा अंमली पदार्थ विक्रीकरीता येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा युनीट 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप पाटील, यांना मिळाली होत्या. त्यानुसार सापळा रचून त्या दुकलीला शुक्रवारी दुपारी ताब्यात घेतले. त्यांच्या अंगझडतीत त्यांच्याकडून 3 लाख 21 हजारांचा 107 ग्रॅम एमडी पावडर या अंमली पदार्थासह, 1 अग्निशस्त्र, 9 जीवंत काडतुसे व 1 चॉपर असा एकुण 4 लाख 21 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. तसेच अभिषेककुमार महतो याचे घरझडतीमध्ये आणखी 02 चॉपर अशी प्राणघातक हत्यारे मिळुन आली असा एकुण 4 लाख 23 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्यांच्याविरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यांच्या ताब्यात मिळून आलेला अंमली पदार्थ, अग्निशस्त्र, जिवंत काडतुसे आणि प्राणघातक हत्यारे कोठुन आणली, याचा शोध सुरू असून पुढील तपास गुन्हे शाखा युनीट 1 करत आहेत. ही कारवाई गुन्हे शाखा, युनीट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप पाटील, पोलीस निरीक्षक कृष्णा कोकणी, सहायक पोलीस निरीक्षक निलेश मोरे, संदीप चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक दिपेश किणी, पोलीस हवालदार विश्वास मोटे, हरीष तावडे, दिपक जाधव, नंदकुमार पाटील, अमोल देसाई, राजेंद्र सांबरे, बाळु मुकणे, पोलीस शिपाई सागर सुरळकर, समीर लाटे यांनी केली आहे.
या दुकलीमधील अभिषेक महतो हा यापुर्वी 307 सारख्या गंभीर गुन्ह्यात अटकेत होता. तसेच त्याला 8 वर्ष शिक्षा झाली होती. तीच शिक्षा भोगून तो नुकताच कारागृहातुन बाहेर आलेला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -