घरक्राइम'या' महिला आमदाराच्या मुलीला मिठाईच्या नावाने 80 हजारांचा ऑनलाइन गंडा

‘या’ महिला आमदाराच्या मुलीला मिठाईच्या नावाने 80 हजारांचा ऑनलाइन गंडा

Subscribe

मीरा-भाईंदर विधासभा मतदारसंघाच्या आमदार गीता जैन यांच्या मुलीला 79 हजार रुपयांचा ऑनलाइन गंडा घालण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मिठाई खरेदीचे ऑनलाइन पेमेंट करताना सायबर भामट्याने जैन यांच्या 30 वर्षीय मुलीला बोलण्यात गुंतवून दोन वेळा त्यांच्या खात्यातून रक्कम काढून घेतली असल्याचे सांगण्यात आले आहे.

मीरा रोड : मीरा-भाईंदर विधासभा मतदारसंघाच्या आमदार गीता जैन यांच्या मुलीला 79 हजार रुपयांचा ऑनलाइन गंडा घालण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मिठाई खरेदीचे ऑनलाइन पेमेंट करताना सायबर भामट्याने जैन यांच्या 30 वर्षीय मुलीला बोलण्यात गुंतवून दोन वेळा त्यांच्या खात्यातून रक्कम काढून घेतली असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांची ऑनलाइन लुबाडणूक होत असल्याचे लक्षात येईपर्यंत खात्यातून जवळपास 80 हजार रुपये वजा झाले होते, अळी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. (MLA Geeta Jain’s daughter was extorted 80 thousand online in the name of sweets)

हेही वाचा – मुंबईत आगीचे सत्र सुरूच, भायखळ्यात मदनपुऱ्यातील इमारतीला भीषण आग

- Advertisement -

पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, आमदार गीता जैन यांची मुलगी स्नेहा सकलेजा यांना त्यांच्या सासूचा फोन आला आणि त्यांनी खरेदी केलेल्या मिठाईचे 480 रुपये ऑनलाइन पेमेंट करण्यास सांगितले. यानंतर स्नेहा यानी त्यांना पाठवण्यात आलेला QR कोड लागलीच स्कॅन केला आणि पेमेंट केले. त्यानंतर काही वेळात एका अज्ञात व्यक्तीचा व्हॉट्सएप क्रमांकावर फोन आला. मिठाई दुकानातील कर्मचारी असल्याचे सांगत त्याने जीएसटी क्रमांक कन्फर्म करण्यासाठी कॉल केल्याचे सांगितले. यावेळी समोरील भामट्याने स्नेहा यांना बोलण्यात गुंतवून त्यांना गुगल पे खाते उघडण्यास सांगितले.

त्यानंतर सायबर भामट्याने सहा अंकी कोड दिला आणि तक्रारदार स्नेहा सकलेजा यांना पासवर्ड पाठला आणि पासवर्ड आणि पेमेंट स्लॉटमध्ये रक्कम टाकण्यास सांगितली. एवढ्यावरच हा भामटा थांबला नाही, तर त्याने पैसे रिफंड करण्याचे सांगत पुन्हा तिच प्रक्रिया करुन घेतली. स्नेहा यांना त्यांच्यासोबत ऑनलाइन फ्रॉड झाल्याचे लक्षात येईपर्यंत खात्यातून 79 हजार 492 रुपये काढून घेण्यात आले होते. या प्रकरणी स्नेहा सकलेजा यांच्या तक्रारीनंतर ऑनलाइन फ्रॉड प्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु, या घटनेबाबतची संपूर्ण माहिती कळल्यानंतर ज्या महिलेसोबत ही घटना घडली आहे, ती महिला आमदार गीता जैन यांची मुलगी असल्याचे समोर आल्यानंतर याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -