घरठाणेठाण्यातील दानशूरांकडून क्षय रुग्णांप्रती सामाजिक बांधिलकी!

ठाण्यातील दानशूरांकडून क्षय रुग्णांप्रती सामाजिक बांधिलकी!

Subscribe

निक्षय मित्र कार्यक्रमानुसार सहा महिने मोफत पोषण आहार

ठाणे : क्षय रोगाच्या विळख्यात अडकलेल्या ठाणे शहरातील ४०० रुग्णांना दिलासा मिळाला आहे. प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियानाद्वारे ठाणे शहरातून क्षय रोगाचे निर्मुलन करण्यासाठी भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी पुढाकार घेतला.निक्षय मित्र योजनेंतर्गत ठाण्यातील दानशूर व्यक्तींनी पहिल्या टप्प्यात ४०० रुग्णांना सलग सहा महिने पोषक आहार देण्याचे ठरविले. तर दुसऱ्या टप्प्यात सुमारे चार हजारांहून अधिक रुग्णांना पोषक आहार देण्याचे नियोजन केले जात आहे. आमदार प्रविण दरेकर यांच्या हस्ते रविवारी पोषक आहाराचे किट रुग्णांच्या नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आले.
ठाणे महापालिकेतील नरेंद्र बल्लाळ सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला दरेकर यांच्यासह भाजपाचे आमदार निरंजन डावखरे, प्रदेश सचिव संदिप लेले, माजी नगरसेवक मनोहर डुंबरे, कृष्णा पाटील, डॉ. योगेश शर्मा, शहर क्षयरोग अधिकारी डॉ. प्रसाद पाटील उपस्थित होते.

सर्वसामान्यांची नस, व्यथा आणि वेदना समजणारे नरेंद्र मोदी हे एकमेव पंतप्रधान आहेत. गरीब कल्याण योजना, मोफत उपचार आदींबरोबरच आता टीबीमुक्त अभियान ही गरिबांची काळजी घेणारे आहे, असे प्रतिपादन आमदार प्रविण दरेकर यांनी केले. ठाणे शहरातील सर्व गरीब रुग्णांना पोषण आहार देण्यात येईल. पुढील सहा महिन्यांत भारतात सर्वात आधी ठाणे शहर टीबीमुक्त होईल, असा विश्वास आमदार डावखरे यांनी व्यक्त केला.ऋ

- Advertisement -

हिंदुत्वाच्या विचारांचे सोने बीकेसीवर – दरेकर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आलेल्या धमकीबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून चौकशी करून प्रकरणाचा पर्दाफाश केला जाईल, अशी प्रतिक्रिया आमदार प्रविण दरेकर यांनी व्यक्त केली. यापूर्वी दसरा मेळावा हा विचारांचा मेळावा असे. मात्र,आता हिंदुत्वविरोधी विचारधारा असल्यामुळे, उद्धव ठाकरे यांचे विचार हे शरद पवार व सोनिया गांधींचेच विचार असतील, असा टोला दरेकर यांनी लगावून खऱ्या अर्थाने हिंदुत्वाच्या विचारांचे सोने बीकेसीवर लुटले जाईल. तर शिवतीर्थावर कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, एमआयएम, सपाचे समर्थक असतील, असेही ते म्हणाले.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -