घररायगडजेएनपीए बंदरातून अडीच कोटींचे रक्तचंदन जप्त

जेएनपीए बंदरातून अडीच कोटींचे रक्तचंदन जप्त

Subscribe

 सीमा शुल्क विभागाची कारवाई, दुबईला पाठविलेला कंटेनर परत मागविला

उरण: जेएनपीए बंदरातून दुबईतील जेबेल अली बंदरात निर्यात करण्यात आलेल्या संशयित कंटेनरमधून अडीच कोटींचे रक्तचंदन सीमा शुल्क विभागाच्या सीआययू या यंत्रणेने जप्त केले आहे.

जेएनपीए बंदरातून दुबईत निर्यात करण्यात आलेल्या मालाच्या कंटेनरबाबत सीमा शुल्क विभागाला संशय होता. त्यामुळे केंद्रीय गुन्हे पथकाने हा कंटेनर परत मागविला होता. या दुबईतून परत मागविण्यात आलेल्या कंटेनरची तपासणी करण्यात आली असता त्यात निर्यात करण्यात आलेला सुमारे तीन मेट्रिक टन रक्तचंदन आढळले आहे. त्याची अंदाजे अडीच कोटी रुपये इतकी किंमत असल्याचे सांगण्यात येते.

- Advertisement -

दोन आठवड्यांपूर्वी उरण परिसरातील गोदामातून अशाच प्रकारे सुमारे ३ मेट्रिक टन रक्तचंदन जप्त करण्यात आले होते. या प्रकरणाचा तपास करीत असतांना समोर आलेल्या माहिती वरून सीमा शुल्क विभागाने हा निर्यात झालेला संशयित कंटेनर परत मागविला होता.या कंटेनरमध्ये हे तस्करी करण्यात आलेले रक्तचंदन सीमाशुल्क विभागाने केलेल्या कारवाईत जप्त करण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -