घरठाणेठाण्यातील घंटाळी मंदिर परिसरात गोळीबाराची घटना; कुख्यात गुंड गणेश जाधवची हत्या

ठाण्यातील घंटाळी मंदिर परिसरात गोळीबाराची घटना; कुख्यात गुंड गणेश जाधवची हत्या

Subscribe

ठाण्यातील घंटाळी मंदिर रोड परिसरात काल अचानक गोळीबाराची घटना घडली आहे. ठाण्यात गुंडांच्या एका टोळीनं कुख्यात गुंड गणेश जाधवची गोळ्या घालून हत्या केली आहे. पहाटेच्या सुमारास झालेल्या या घटनेत एकजण जखमी झाली आहे. संपत्तीच्या वादातून हा गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर नौपाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरु आहे. ठाणे शहरात या गोळीबारामुळे खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्यातील घंटाळी मंदिर परिसरात पहाटे चार ते पाच वाजण्याच्या सुमारास हा गोळीबार झाला आहे. संपत्तीच्या वादातून ही घटना झाल्याचे समजतेय. या गोळीबारात कुख्यात गुंड गणेश जाधव याची हत्या करण्यात आल्याचे उघड झाले आहे. दरम्यान नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत तपास सुरु आहे.

- Advertisement -

कुख्यात गुंड गणेश जाधवची हत्या झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत विपीन मिश्रा, सौरभ शिंदे आणि सुरज मेहरा या तीन आरोपींना वेगवेगळ्या भागातून अटक केली आहे.


शिवाजी पार्कवर मनसेचा दीपोत्सव; राज ठाकरेंसह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -