घरभक्तीरमा एकादशीला करू नका 'या' पदार्थांचे सेवन; अन्यथा...

रमा एकादशीला करू नका ‘या’ पदार्थांचे सेवन; अन्यथा…

Subscribe

अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीला रमा एकादशी म्हटलं जात. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा-उपासना केली जाते. सोबतच यादिवशी देवी लक्ष्मीची देखील या दिवशी पूजा केली जाते. यांच्या उपासनेने पापांचा नाश होतो. एकादशीचे व्रत केल्याने आयुष्यात सुख-समृद्धी येते. रमा एकादशीचे व्रत केल्याने व्यक्तिला मृत्यूनंतर सद्गगती प्राप्त होते. या सगळ्या व्रतांमध्ये सर्वात कठीण व्रत मानले जाते.

रमा एकादशी वेळ
20 ऑक्टोबर, गुरुवार संध्याकाळी 04 वाजून 04 मिनटांपासून ते 21 ऑक्टोबर, शुक्रवार संध्याकाळी 05 वाजून 22 मिनिटांपर्यंत असणार आहे.

- Advertisement -

रमा एकादशी कशी साजरी कराल?

  • रमा एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे, स्वच्छ कपडे परिधान करून सूर्य देवाला अर्घ्य अर्पण करावे.
  • घरातील देवी-देवतांची पूजा करावी, तसेच भगवान विष्णूंना पिवळी फुलं, चंदन, तुळस अर्पण करावी. धूप-दीप लावून त्यांची आरती करावी.
  • पूजा पूर्ण झाल्यावर ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ या मंत्राचा जप करा, तसेच विष्णूच्या स्तोत्रांचे पठण करा.
  • भगवान विष्णूंना नैवेद्य अर्पण करा.

रमा एकादशीचे महत्व :

- Advertisement -
  • रमा एकादशीचे व्रत केल्याने भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होतात. तसेच अशा व्यक्तीच्या घरात कधीही धन-धान्याची कमतरता भासत नाही.
  • रमा एकादशीचे व्रत केल्याने कुटुंबातील वाद, क्लेश बंद होतात तसेच आर्थिक परिस्थिती सुधारते. व्यवसायात वाढ होते.
  • रमा एकादशीचे व्रत केल्याने यश, किर्ती वाढते. तसेच शिक्षण आणि नोकरीमध्ये सफलता प्राप्त होते.

रमा एकादशीला करू नका ‘या’ पदार्थांचे सेवन

एकादशीचे व्रत हे संपूर्ण दिवसाचे असते. अनेकांना संपूर्ण दिवस व्रत करता येत नाही. अश्या व्यक्तींना व्रत नाही केले तरी चालेल, मात्र त्या दिवशी या गोष्टींचे सेवन करणे टाळा.

  • भात खाऊ नका
    शास्त्रानुसार, एकादशीच्या दिवशी कधीही भात खाऊ नये. असं म्हणतात की, जी व्यक्ती एकादशीच्या दिवशी भात खाते. त्या व्यक्तीला भगवान विष्णूंचा आर्शिवाद मिळत नाही. एकादशीच्या भात खाणं पाप मानले जाते.
  • मीठाचे सेवन करू नका
    शास्त्रानुसार, एकादशीच्या दिवशी कधीही मीठ खाऊ नये, अधवा कमी प्रमाणात खावे.
  • मांसाहार करू नका
    शास्त्रानुसार, एकादशीला हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र व्रत मानले जाते, त्यामुळे या दिवशी कोणत्याही प्रकारचा मांसाहार करू नये. सात्विक आहार घ्यावा.
  • या गोष्टींचे सेवन करू नका
    एकादशीच्या दिवशी तांदूळ, मसूर डाळ, वांगे, मूळा, कांदा , लसूण यांचे सेवन करणे टाळावे.

हेही वाचा :

भाऊबीज का साजरी केली जाते? काय आहे यमराज आणि यमुनेची कथा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -