घरठाणेलोकप्रतिनिधींना अनावश्यक संरक्षण नको, शिंदे सरकारला भाजपचा घरचा आहेर

लोकप्रतिनिधींना अनावश्यक संरक्षण नको, शिंदे सरकारला भाजपचा घरचा आहेर

Subscribe

ठाणे – शिंदे फडणवीस सरकारने राज्यातील आमदारांना पोलीस सुरक्षा देण्यात आली आहे. तर विरोधी पक्षातील अनेक नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील आमदारांच्या संरक्षणावरील खर्चाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यातच आता भाजपाचे आमदार किसन कथोरे यांनी लोकप्रतिनिधींच्या संरक्षणावर होणारा अवाढव्य खर्च बंद करावा, अशी मागणी केली आहे.

जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी प्रशासनाच्या माध्यमातून त्यांचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करणे अपेक्षित आहे. मात्र सध्या याचे विपरीत चित्र दिसू लागले आहे. लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनाच लोकांमध्ये जाताना मोठ्या प्रमाणात संरक्षणाची गरज वाटत आहे. लोकप्रतिनिधींना खरंच भीती वाटत असते की, फक्त संरक्षणाचा डामडौल मिरवायचा असतो, असा प्रश्न देखील कथोरे यांनी उपस्थित केला.

- Advertisement -

सुरक्षा रक्षकांच्या कोंडाळ्यात राहणे ही आता अनेक लोकप्रतिनिधींची फॅशन झाली आहे. जनतेच्या पैशांचा हा अपव्यय त्वरित थांबवावा. ज्या लोकप्रतिनिधींना खरंच संरक्षणाची गरज आहे. केवळ त्यांनाच संरक्षण द्यावे मागणी आमदार किसन कथोरे यांनी केली आहे.

सध्या कुणीही उठतो आणि अति महत्वाच्या व्यक्तींना असलेल्या पोलिस संरक्षणाची कवच कुंडले धारण करतो, ते चुकीचे आहे. जनतेतून निवडून आल्यानंतर मला जनतेपासून धोका असल्याने संरक्षण घेण्याची गरज का वाटतेय ? याबाबत राज्यातील प्रत्येक लोकप्रतीनिधिनी विचार करण्याची गरज आहे, मत आमदार किसन कथोरे यांनी व्यक्त केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -