घरठाणेअंबरनाथ, उल्हासनगरातील वीज समस्या प्राधान्याने सोडवणार

अंबरनाथ, उल्हासनगरातील वीज समस्या प्राधान्याने सोडवणार

Subscribe

 ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचे आश्वासन

अंबरनाथ आणि उल्हासनगर शहरात अनेक वर्षांपासून विजेच्या समस्या भेडसावत आहेत. या समस्या सोडविण्याच्या दृष्टीने आमदार डॉ. बालाजी किणीकर महावितरण विभागाकडे पाठपुरावा केला होता. या संदर्भात राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीज संबंधी समस्या लवकरात लवकर सोडविल्या जातील असे आश्वासन दिले आहे. बुधवारी आमदार डॉ बालाजी किणीकर यांनी वीज समस्यांबाबत ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या मंत्रालयीन दालनात महावितरणच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसह बैठक घेतली. या बैठकीच्या सुरवातीला वाढत्या शहरीकरणा याभागात महावितरणाची व्यवस्था ही सक्षम करण्याच्या सूचना ऊर्जा मंत्री राऊत यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.

यानंतर आमदार डॉ बालाजी किणीकर यांनी  उल्हासनगर आणि अंबरनाथ येथील वीज समस्यांबाबत मुद्दे उपस्थित केले. यात उल्हासनगर येथील गायकवाड पाडा येथे सब स्टेशन उभारण्याकरता महावितरणकडे जमीन हस्तांतरित करण्यात आले असून याठिकाणी सब स्टेशन उभारण्याचे काम जलदगतीने मार्गी लावण्यात यावे,  उल्हासनगर ४ येथे सब स्टेशन स्टेशन उभारण्यात यावेत, अंबरनाथ मधील  मोरिवली येथे असलेले सबस्टेशनची क्षमता वाढविण्यात यावी, विमको नाका येथील एक आणि दोन सप्लाय टॉवर नादुरुस्त झाले असून ते तातडीने बदलण्यात यावे, उल्हासनगर ४ व ५ मधील ऊर्जा नियोजनासाठी स्वर्गदार, उल्हासनगर  ५ येथे नवीन २२/२२ केव्ही चे स्विचिंग स्टेशन उभारण्यात यावे.

- Advertisement -

नियोजित नवीन पाले अंबरनाथ औद्योगिक वसाहतीच्या ऊर्जाभार नियोजनासाठी नवीन २२०/२२ केव्ही अति उच्च दाब उपकेंद्र उभारण्यात यावे. अंबरनाथ पूर्व व पश्चिम भाग तसेच उल्हासनगर ४ व ५ क्षेत्रातील सर्व उपरी वाहिन्या भूमिगत करण्यात यावे.  महावितरण विभागाच्या योजनेअंतर्गत विविध कामे मंजूर करण्यात मात्र त्यास विलंब लागत आहे, आदी विषयांकडे लक्ष वेधले. त्यावर ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी  प्रलंबित कामांची चौकशी करण्यात यावी, तसेच संबंधित ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याच्या सूचना यावेळी दिल्या. अंबरनाथ व उल्हासनगर मधील जुने व जीर्ण झालेले लाईटचे पोल तात्काळ बदलाच्या सूचना ही यावेळी ऊर्जा मंत्री यांनी दिल्या. तसेच याप्रसंगी महावितरणच्या संदर्भातील अन्य विषयांवर चर्चा करण्यात आली.

या बैठकीसाठी माजी नगराध्यक्ष सुनिल चौधरी, माजी उपनगराध्यक्ष अब्दुल भाई शेख, नगरसेवक  धनंजय बोडारे, माजी नगरसेवक सुभाष साळुंखे, सिंधी सेनेचे रवि खिलनानी, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, प्रकल्प संचालक  भालचंद्र खंडाईत,  अरविंद भालेकर,अधीक्षक अभियंता भावले, कार्यकारी अभियंता प्रवीण चावले तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -