घरठाणेपल्स पोलिओ लसीकरण मोहिम

पल्स पोलिओ लसीकरण मोहिम

Subscribe

कल्याण । कल्याण डोंबिवली मनपा तर्फे 3 मार्च 2024 रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबविली जाणार आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात 0 ते 5 वर्षे वयाखालील सुमारे 1,66,170 बालकांना 1320 लसीकरण केंद्रांमार्फत मोफत पोलिओची लस पाजण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच 3 मार्च 2024 रोजी जी बालके बुथवर पोलिओचा डोस घेण्यासाठी येऊ शकणार नाही त्यांना पुढील 5 दिवसात त्यांच्या घरोघरी जाऊन लस पाजण्यांत येईल. त्यासाठी एकूण 716 लसीकरण चमू असतील. मागील वेळेस 10 डिसेंबर 2023 दरम्यान पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेतंर्गत 1,74,085 बालकांना पोलिओ लस पाजण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -