घरठाणेबदलापूरमध्ये सोमवारी सोनू निगम

बदलापूरमध्ये सोमवारी सोनू निगम

Subscribe

‘अटल संध्या’ कार्यक्रमात दिग्गज विनोद कलाकारांची उपस्थिती

भाजपा बदलापूर-कुळगाव विभाग, कपिल पाटील फाऊंडेशनच्या वतीने प्रसिद्ध गायक सोनू निगम यांच्या गीतांवर थिरकण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. बदलापूर येथील आदर्श महाविद्यालयाच्या मैदानावर सोमवारी आज सायंकाळी 6 वाजता होणार्‍या ‘अटल संध्या’ कार्यक्रमात सोनू निगमबरोबरच प्रसिद्ध विनोदी कलाकारांच्या उपस्थितीत रसिकांना हास्यांचे फवारे उडवता येणार आहेत. केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील यांच्याकडून दरवर्षी 25 डिसेंबर रोजी बदलापूर येथे ‘अटल संध्या’ कार्यक्रम आयोजित केला जातो. यापूर्वी कार्यक्रमात कैलास खेर, शाल्मली खोलगडे यांच्यासह दिग्गज कलाकारांच्या गीतांची मेजवानी रसिकांना मिळाली होती. यंदाही प्रसिद्ध गायक सोनू निगम यांच्याकडून प्रसिद्ध गीतांची पर्वणी रसिकांना उपलब्ध होईल. सोनू निगम यांच्या ‘अभी मुझे में कही, कभी खुशी कभी गम’ या गीतांबरोबरच देशभक्तीपर ‘संदेसे आते है, जहां डाल डाल पर, जिंदगी मौत ना बन जाये’ आदी देशभक्तीपर गीतांचा जागर होणार आहे.

प्रसिद्ध हास्य कलाकार समीर चौगुले, चेतना भट, पृथ्वीक प्रताप, शिवाली परब यांची हास्यांची मैफल रंगेल. प्रसिद्ध अभिनेत्री श्रुती मराठे, स्मिता गोंदकर यांच्याकडून विविध गीतांवर नृत्याविष्कार सादर केला जाईल. अभिनेत्री स्पृहा जोशी यांच्याकडून कार्यक्रमाचे निवेदन केले जाणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील, माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे, भाजपाचे बदलापूर पूर्व अध्यक्ष संजय भोईर आणि पश्चिम अध्यक्ष शरद तेली यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -