बांधकाम सुरु असलेल्या इमारतीवरून कोसळून कामगाराचा मृत्यू ; ठाणे वर्तकनगरमधील घटना

thane worker dies after faling building during construction amy

ठाण्यातील वर्तकनगरमधील बांधकाम सुरु असलेल्या इमारतीवरून कोसळून एका कर्मचाऱ्याचा मृत्यूची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेतील कामगाराच्या शरीरात लोखंडी सळ्या घुसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. आशिष चव्हाण (उत्तरप्रदेश, मोहमदाबाद, वय 22) असं या कर्मचाऱ्याचं नाव आहे.

नवीन इमारतीचे बांधकाम सुरू असताना हा कामगार लिफ्ट डकच्या खड्यामध्ये वरून खाली पडल्याची घटना रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली. वरून पडल्याने खाली असलेल्या लोखंडी परांचीचा पाईप शरीरात घुसल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्याला ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात नेल्यावर डॉक्टरांनी मृत घोषित केले.

वर्तकनगर येथे थिराणी शाळेजवळ पुराणिक बिल्डर्सचे तळ अधिक 30 मजली नवीन इमारतीचे बांधकाम सुरू आहे. हे काम सुरू असताना रविवारी रात्री 9 वाजून 56 मिनिटांच्या सुमारास 22 वर्षीय आशिष हा कामगार लिफ्ट डकच्या खड्यामध्ये वरून खाली पडला. तसेच खाली असलेल्या लोखंडी परांचीचा पाईप शरीरात घुसल्याने त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी वर्तकनगर पोलीस, आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेतली.

तसेच मृत कामगाराला 3.30 वाजताच्या सुमारास गॅस कटरने सदर लोखंडी परांचीचा पाईप कट करून बाहेर काढण्यात आले आहे. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अविनाश सावंत यांनी दिली.


अग्निपथ योजनेविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस रस्त्यावर; ठाणे हायवेवर रस्ता रोको