घरठाणे‘त्या’ सफाई कर्मचार्‍यांची थकीत रक्कम तातडीने द्यावी

‘त्या’ सफाई कर्मचार्‍यांची थकीत रक्कम तातडीने द्यावी

Subscribe

भाजपाची आयुक्तांकडे मागणी

कोविडच्या कठीण काळामध्ये शासकीय कर्मचार्‍यांचे योगदान हे अतुलनीय राहिले आहे. या काळात मृत्युमुखी पावलेल्या कर्मचार्‍यांना आपण कोविड योद्धा असे संबोधले तसेच त्यांचा गौरव देखील केला. ठाणे महापालिकेतील सुमारे 48 सफाई कर्मचारी कोविड आजाराने कर्तव्य बजावीत असताना दुर्दैवाने मृत्युमुखी पडले. परंतु यांच्या काही वारसांना अजूनही पगाराची काही रक्कम देणे थकित आहे.

या मध्ये बराच काळ उलटून दिरंगाई झाली असल्याने, ती रक्कम तसेच सातव्या वेतन आयोगातील तफावत रक्कम मृत्युमुखी पडलेल्या कर्मचार्‍यांच्या वारसांना तातडीने देण्यात यावी. अशी मागणी भाजपा महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते सुजय पतकी यांनी ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांना भेटून केली आहे. आयुक्तांनी यावर अतिशय सकारात्मक भूमिका घेऊन तातडीने प्रक्रिया करू असे आश्वासन दिले तसेच प्रस्ताव सादर करण्याचे आदेश संबंधित विभागांना दिले आहेत. यावेळी मृणाल पेंडसे महाराष्ट्र महिला मोर्चा सचिव, निलेश कोळी फ्रेंड्स ऑफ बीजेपी लोकसभा संयोजक, रक्षा यादव, प्रमोदिनी कांबळे, नताशा सोनकर उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -