घरठाणेबारा महिन्यात 4 हजार 189 तक्रारींशी ठामपा आपत्ती व्यवस्थापनेचा सामना

बारा महिन्यात 4 हजार 189 तक्रारींशी ठामपा आपत्ती व्यवस्थापनेचा सामना

Subscribe

856 आगीच्या घटना, 469 झाडे कोलमडून पडली

ठाणे । पोलिसांना जसे ऑन ड्युटी चोवीस तास काम करावे लागत आहे, याच प्रकारे ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनेला ऑन ड्युटी चोवीस तास काम करावे लागत असून महानगपालिकेच्या हद्दीत कुठलीही आपत्तीजनक घटना घडली की पहिला कॉल आपत्ती व्यवस्थापन ठाणे विभागाला केला जातो, यामुळे प्रत्येक कॉलला तत्काळ रिस्पॉन्स या ठामपा आपत्ती विभागाकडून दिला जातो. यामुळे जानेवारी 2023 ते डिसेंबर 2023 या वर्षी 4189 तक्रारी आपत्ती व्यस्थापनेकडे प्राप्त होऊन तात्काळ रिस्पॉन्स आपत्ती व्यवस्थापन विभागाने देऊन आपली चोख कामगिरी केल्याने सर्वत्र आपत्ती व्यवस्थापनाचे कौतुक होत आहे.
ठाणे महानरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कार्यालयामध्ये 47 कर्मचारी शिप ड्युटीमध्ये काम करत आहेत. तसेच टीडीआरएफ टीम मध्ये देखील 31 जवान कार्यरत आहेत. दूरध्वनी वरून आलेला प्रत्येक कॉलची शहानिशा करून तत्काळ घटनेची माहिती घेऊन कर्मचारी घटनास्थळी पोहोचून मदतकार्य करत आहेत. यामुळे घटना स्थळी वेळीच आपत्ती व्यवस्थापन टीम आणि फायरमन वेळीच पोहोचत असल्याने नागरिकांचा जीव वाचत आहे.
बारा महिन्यात मोठ्या आणि किरकोळ अशा 856 आगीच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये अग्निशमन टीमने देखील चोख कामगिरी केल्याचे दिसत आहे. ठाणे महानरपालिकेच्या हद्दीत कुठलीही घटना घडली आणि ठाणे आपत्ती विभागाला कॉल आला की तत्काळ आपत्ती व्यवस्थापन अधिकारी आणि त्यांची टीम घटना स्थळाची पाहणी करुण मदत कार्य सुरू करत आहेत. यामुळे ठाणे महानरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन एक प्रकारे युद्ध पातळीवर नागरिकांना मदत देण्याचे महान कार्य करत आहे. महानगर पालिका क्षेत्र असो किंवा राज्यात कुठेही आपत्ती जनक परिस्थिती असो ठाणे महानगर पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनेला आदेश आले कि तात्काळ तयारी करून टीडीआरएफ टीम आणि आपत्ती व्यवस्थापन टीम रवाना होत आहेत.

ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनेला कॉल आला की तत्काळ रिस्पॉन्स दिला जातो, घटना स्थळी आपत्ती व्यवस्थापन टीम आणि फायरमन पोहोचतात, परिस्थिती जास्त घातक असेल तर त्यावेळी टीडीआरएफ टीमला बोलावले जाते. एखादी घटना घडली कि मदत तात्काळ पोहोचली पोहोचवली जाते.
– यासिन एम. तडवी, आपत्ती व्यवस्थापक अधिकारी, ठाणे महानगरपालिका, ठाणे

जानेवारी २०२३ ते डिसेंबर २०२३ या वर्षाच्या घटना

- Advertisement -

जानेवारी –
२९५ तक्रारी, आगीच्या घटना- ६७, झाडे पडणे- १३,पाणी पाइपलाइन – २५, गॅस लीकेज -३, मॉकड्रील -२,इतर -१८०

फेब्रुवारी –
२८३ – तक्रारी, आगीच्या घटना- ११५, झाडे धोकादायक -१४,पाणी पाइपलाइन – १४,प्लास्टर पडणे -४, इमारत धोकादायक -२, इतर -१२२

- Advertisement -

मार्च –
२७२ -तक्रारी, आगीच्या घटना-९५, झाडे धोकादायक -१८,पाणी पाइपलाइन – २०, प्लास्टर पडणे -१, भिंत पडणे-१, लँडस्लाईड -१, इतर -१२२

एप्रिल –
३०४ – तक्रारी, आगीच्या घटना- ८७, झाडे धोकादायक -२१,पाणी पाइपलाइन – २६, गॅस लीकेज -१,टेरेस स्लॅब पडणे-१,  भु – सखलन -१, इतर -१४०

मे –
२९६ – तक्रारी, आगीच्या घटना- ७५, झाडे पडणे – १८, झाडे धोकादायक -१८,पाणी पाइपलाइन लीकेज- २४, स्लॅब पडणे-४, गॅस लीकेज -२,भिंत पडणे-१,मॉकड्रील -१२, इतर -१३९
जून –
७४१-  तक्रारी, आगीच्या घटना- ८२, झाडे पडणे -१२९,
झाडे धोकादायक -६५,पाणी पाइपलाइन – २६, पाणी जमा -५६, पाणी पाइपलाइन लीकेज-२६
गॅस लीकेज -२, प्लास्टर पडणे – ४, भिंत पडणे -२, नाल्याची भिंत पडणे -६,टेरेस गॅलरी पडणे – ३, इमारत दुर्घटना -२, भु – सखलन -५,पत्र्याच्या शेड पडने-६, मॉकड्रील -२,
इतर -२१२

जुलै –
७१५-  तक्रारी, आगीच्या घटना- ३८, झाडे पडणे -१५०,
झाडे धोकादायक -७८, झाडाच्या फांद्या पडणे – १४९, पाणी पाइपलाइन लिकेज- १५, पाणी जमा -३१, गॅस लीकेज -२, प्लास्टर पडणे -४, घरे पडणे -२, इमारत पडणे -२, इमारत धोकादायक -१,
भिंत पडणे -८, नाल्याची भिंत पडणे -१,टेरेस गॅलरी पडणे – २, भु – सखलन -१, इतर -२२६

ऑगस्ट –
२९२ -तक्रारी, आगीच्या घटना- २७, झाडे पडणे -२९,
झाडे धोकादायक -१६, झाडाच्या फांद्या पडणे – ४०, पाणी पाइपलाइन लीकेज – १६,
गॅस लीकेज -२, प्लास्टर पडणे -२, प्लास्टर पडणे -२ ,भिंत पडणे -२, इतर -१५७

सप्टेंबर –
२६३-  तक्रारी, आगीच्या घटना- ३४, झाडे पडणे -३८,
झाडे धोकादायक -८, झाडाच्या फांद्या पडणे – ३९, पाणी पाइपलाइन लिकेज -१०, पाणी जमा -३,
गॅस लीकेज -१, प्लास्टर पडणे -१, घरे पडणे -१, इमारत शेड-२,
भिंत पडणे -१, नाल्याची भिंत पडणे -१, इतर -१२१

ऑक्टोबर –
२२०-  तक्रारी, आगीच्या घटना- ६३, झाडे पडणे -११,
झाडे धोकादायक -६, झाडाच्या फांद्या पडणे – १६, पाणी पाइपलाइन लिकेज-२७,

गॅस लीकेज -३, प्लास्टर पडणे-१, इतर -९०

नोव्हेंबर –
२६०-  तक्रारी, आगीच्या घटना- १०१, झाडे पडणे -११,
झाडे धोकादायक -२, झाडाच्या फांद्या पडणे – २१, पाणी पाइपलाइन लिकेज – १२,
गॅस लीकेज -२, प्लास्टर पडणे – ५, इमारत धोकादायक-१, भु – सखलन -१, इतर -१०२

डिसेंबर –
२४८-  तक्रारी, आगीच्या घटना- ७२, झाडे पडणे -१८,
झाडे धोकादायक -३, झाडाच्या फांद्या पडणे -६, पाणी पाइपलाइन लिकेज- १८,

गॅस सीएनजी लिकेज- ३, प्लास्टर पडणे – २, इमारत धोकादायक-१, मोक ड्रिल-१, इतर -१२४

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -