घरठाणेमारहाणीच्या निषेधार्थ दिव्यातील व्यापा-यांनी पुकारला बंद

मारहाणीच्या निषेधार्थ दिव्यातील व्यापा-यांनी पुकारला बंद

Subscribe

ठाणे । काही दिवसांपूर्वी व्यापा-याला करण्यात आलेल्या मारहाणीचा निषेध करण्यासाठी तसेच त्याला न्याय मिळावा. या मागणीसाठी सोमवारी दिव्यातील व्यापा-यांनी काही काळासाठी बंद आंदोलन पुकारले होते. भाजपाच्या स्थानिक पदाधिका-यांनी या बंदला पाठिंबा दिला.

मुंब्रा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शहाजी शेळके यांना व्यापा-यांनी त्यांच्या मागण्याचे निवेदन दिले. झालेल्या घटनेची पुन्हा सखोल चौकशी करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिल्यानंतर बंद मागे घेण्यात आला. दरम्यान भाजपाच्या पदाधिका-यांची व्यापा-यांना न्याय मिळवून द्यायची खरोखरच इच्छा असेल. तर त्यांनी त्यांच्या पक्षाच्या गृहमंत्र्यां कडे मागणी करुन पोलिसां मार्फत गुन्हा करणार्‍यांवर तातडीने कारवाई करुन आरोपीला धडा शिकवला पाहिजे. अशी मागणी करुन भाजपच्या ताब्यात पोलीस विभाग असतानाही भाजप दिव्यात बंद करणार असेल तर मग आरोपीवर कारवाई करणार कोण ? असा सवाल दिवा मर्चंट व्यापारी संस्थेच्या अध्यक्षा ज्योती पाटील यांनी बंदच्या पार्श्वभूमीवर उपस्थित केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -