घरठाणेडोंबिवलीत तलावात बुडून भाऊ बहिणीचा दुर्दैवी मृत्यू

डोंबिवलीत तलावात बुडून भाऊ बहिणीचा दुर्दैवी मृत्यू

Subscribe

तलावात बुडून बहीण भावाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी दुपारच्या सुमारास डोंबिवलीजवळील दावडी गाव येथे घडली.मृत बहीण भाऊ डोंबिवली पश्चिमेतील महाराष्ट्रनगर परिसरात राहणारे होते.पोलिसांना तरुणाच्या खिशातील लायसन्स मिळाले होते. यातील मृत तरुण हा डॉक्टर होता .या घटनेने डोंबिवलीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
रविजीत आणि कीर्ती हे दोघे रविवारी दुपारी कुत्र्याला आंघोळ घालण्यासाठी दावडी गावाजवळील गावदेवी मंदिरालगत तलावात उतरले.

मात्र पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्याने दोघांचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला .याबाबतची माहीती मिळताच स्थानिक ग्रामस्थ आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले होते. अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी दोघांचा मृतदेह तलावातून बाहेर काढल्यानंतर रविजितच्या खिशात पोलिसांना त्याच्या आईचे ड्रायव्हिंग लायसन्स सापडले.त्यावरून मयत कुठचे रहिवासी आहेत व कोण आहेत ? याची ओळख पटण्यास मदत झाली. या दोघांचा मृतदेह पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, कीर्ती रविंद्रन (१५ ) व रविजित रविंद्रन ( २३) असे मृत पावलेल्या भाऊ बहिणीचे नाव आहे . ते डोंबिवली पश्चिम महाराष्ट्र नगर परिसरातील गुरुसाईचरण इमारतीत आई वडील आणि मुले रविजित आणि कीर्ती असे कुटुंब राहत होते.त्यांची आई उमेशनगर मधील साईश्रद्धा चाळीत ट्युशन घेत असे. आईवडील गावी गेले होते.त्यामुळे रविवारी सुट्टी असल्याने दोघे आपल्या कुत्र्याला आंघोळ घालण्यासाठी दुचाकीवरून दावडी येथील तलावात गेले होते. मात्र तलावात उतरताच काळाने दोघांवर घाला घातला .

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -