घरठाणेबदलापूरमध्ये मराठी नववर्षाचे उत्साहात स्वागत

बदलापूरमध्ये मराठी नववर्षाचे उत्साहात स्वागत

Subscribe

हिंदू वर्ष नववर्षाचे स्वागत बदलापूरमधे जल्लोषात करण्यात आले. बदलापूरच्या हेंद्रेपाडा, बेलवली, कुळगाव परिसरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. बदलापूर पूर्वेच्या गांधी चौकात शोभायात्रेची सांगता झाली. नववर्षानिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेत शहरातील नागरिक पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते. या शोभायात्रेत नागरिकांसह राजकीय पक्षांचे नेते सुद्धा उपस्थित होते. बदलापूर शहराच्या विविध भागात नववर्ष स्वागत यात्रा काढून नववर्षाचं उत्साहात स्वागत करण्यात आले. सकाळी ७:३० वाजता हेंद्रेपाड्यातून शोभायात्रेला सुरवात करण्यात आली.

हेंद्रेपाडा, सर्वोदय नगर, बाजारपेठ, रंजन सोसायटी, कात्रप, स्टेशन पाडा, छत्रपती शिवाजी महाराज चौक या परिसरात शोभायात्रा काढण्यात आली होती. बदलापूरमधील हनुमान मंदिर देवस्थान, साई श्याम देवस्थान मित्रमंडळ, राष्ट्र सेविका समिती, भगिनी निवेदिता शाखा, रत्नागिरी सिंधुदुर्ग रहिवाशी मित्र मंडळ, प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, यांच्या वतीने शोभायात्रा काढण्यात आली होती. ढोलताशांच्या गजरात वाजत गाजत निघालेल्या शोभा यात्रेत नागरिकांनी लाठी काठी, लेझीम, झिम्मा, फुगडी आणि पारंपरिक नृत्य सादर केले. सोबतच शहरातील चित्रकारांनी चित्र रेखाटले. तर निसर्ग प्रेमी संस्थेच्या वतीने निसर्ग संवर्धनाचा संदेश देण्यात आला. तसंच हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ चित्ररथाच्या माध्यमातून मांडण्यात आली होती. कोरोना नंतर तब्बल दोन वर्षांनी शहरात शोभायात्रा काढण्यात आली. त्यामुळे शहरातील नागरिक उत्साहात मोठ्या संख्येने यात्रेत सहभागी झाले होते. सकाळी ७:३० वाजता निघालेल्या शोभायात्रेची १२ वाजता सांगता झाली.बदलापूर पूर्वेच्या गांधी चौकात यात्रेची सांगता झाली. यावेळी नववर्ष स्वागत यात्रा समितीचे अध्यक्ष तुषार आपटे, माजी नगराध्यक्ष राम पातकर, राजेंद्र घोरपडे, माजी नगरसेवक संजय भोईर, रमेश सोळसे, कॅप्टन आशिष दामले, किरण भोईर, वरुण म्हात्रे, यांच्या सह स्वागत यात्रा समितीचे सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -