घरट्रेंडिंग100 वर्षांनंतर घडणार अद्भूत योगायोग; 3 वेगवेगळ्या रुपात दिसणार सूर्यग्रहण

100 वर्षांनंतर घडणार अद्भूत योगायोग; 3 वेगवेगळ्या रुपात दिसणार सूर्यग्रहण

Subscribe

2023 मध्ये एकूण 4 ग्रहण असणार आहेत. ज्यात 2 सूर्यग्रहण आणि 2 चंद्रग्रहण असतील. 20 एप्रिल रोजी वर्षातील पहिले सूर्यग्रहण असेल. हे ग्रहण 20 एप्रिल रोजी सकाळी 7:04 वाजता सुरु होणार असून दुपारी 12:29 पर्यंत असणार आहे. हे ग्रहण भारतात दिसणार नाही. या दिवशी अमावस्या देखील आहे.

ज्योतिष शास्त्रानुसार, हे सूर्य ग्रहण संकरीत सूर्यग्रहण असणार आहे. याचा अर्थ एक सूर्यग्रहण पण एकाच दिवसात 3 सूर्यग्रहण दिसणार आहेत. म्हणूनच शास्त्रज्ञांनी या सूर्यग्रहणाला संकरित सूर्यग्रहण असे नाव दिले आहे.

- Advertisement -

3 वेगवेगळ्या रुपात दिसणार सूर्यग्रहण

Total Solar Eclipse 2017: Fun Facts - Grand Events Tent & Event Rental2023 चे पहिले सूर्यग्रहण खूप खास असणार आहे कारण ते तीन वेगवेगळ्या रूपात दिसणार आहे. ज्यात आंशिक, संपूर्ण आणि कंकणाकृती सूर्यग्रहण आहे. जेव्हा चंद्र सूर्याच्या एका छोट्या भागासमोर येऊन त्याच्या प्रकाशावर परिणाम करतो तेव्हा त्याला आंशिक सूर्यग्रहण म्हणतात.

तर दुसरीकडे, जेव्हा चंद्र सूर्याच्या मध्यभागी येतो आणि त्याचा प्रकाश रोखतो, ज्यामुळे मध्यभागी अंधार पडतो आणि बाहेरच्या वर्तुळावर फक्त प्रकाशाची वलय दिसते, तेव्हा त्याला कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणतात.

- Advertisement -

तसेच जेव्हा पृथ्वी, सूर्य आणि चंद्र एकाच रेषेत असतात, तेव्हा पृथ्वीचा एक भाग पूर्णपणे अंधारात असतो. या स्थितीला संपूर्ण सूर्यग्रहण म्हणतात.

अशा प्रकारचे असते संकरीत सूर्यग्रहण

20 एप्रिल रोजी सूर्यग्रहणाच्या निमित्ताने विविध ठिकाणी आंशिक, संपूर्ण आणि कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार आहे. अशाप्रकारे एका सूर्यग्रहणाचे 3 दृश्य पाहायला मिळत असल्याने या स्थितीला संकरीत सूर्यग्रहण म्हणतात. ही स्थिती केवळ 100 वर्षांतून एकदाच पाहायला मिळते.


हेही वाचा :

तब्बल 10 वर्षानंतर! महाधन राजयोगाचा ‘या’ 3 राशींना होणार फायदा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -