घरट्रेंडिंगVideo : पाहा 'ढगफुटी'चा थरार...

Video : पाहा ‘ढगफुटी’चा थरार…

Subscribe

बॉलीवूड स्टार्स त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर नेहमीच हटके पोस्ट टाकत असतात. अभिनेता फराहन अख्तरने तर चक्क 'ढगफुटी' होतानाचा व्हिडीओ शेअर केलाय. प्रत्यक्ष ढगफुटी पाहून तुम्हीही स्तब्ध व्हाल.

मान्सूनच्या काळात होणारी ढगफुटी आणि ढगफुटीमुळे होणारे नुकसान याविषयीच्या बातम्या आपण अनेकदा पाहतो. मात्र, कुणी ‘याची देही याची डोळा’ ढगफुटी क्वचितच पाहिली असेल. ढगफुटी म्हणजे नेमकं काय? ढगफुटी कशी होते? याची उत्सुकता तुमच्याही मनात असेल ना. नुकताच अभिनेता फरान अख्तरने ढगफुटी होतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. अंगावर काटा आणणारा असा हा व्हिडीओ आहे. सोशल मीडियावर दिवसभर हाच व्हिडीओ व्हायरल होतो आहे.

- Advertisement -

बहुतांशी बॉलीवूड स्टार्स हे सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. सोशल मीडियावरुन हे स्टार्स त्यांच्या व्यावसायिक तसंच खासगी आयुष्यातील अनेक गोष्टी आपल्या चाहत्यांपर्यंत पोहचवत असतात. मात्र, काही स्टार्स त्यांच्या इन्स्टाग्राम आणि ट्वीटर अकाउंटवरुन काही हटके विषयांवरील पोस्टही सातत्याने करत असतात. याच धर्तीवर अभिनेता फरहान अख्तरने ढगफुटीचा हा व्हिडीओ शेअर केला आहे.

‘अंगावर काटा’ आणणारा व्हिडीओ

फरहान अख्तरने शेअर केलेला हा व्हिडीओ पाहिल्यावर आपण थक्क होऊन जातो. पीटर मेअर या फोटोग्राफरने ढगफुटीचा हा थरारक व्हिडीओ आपल्या कॅमेरात टिपला आहे. हे दृष्य आहे ऑस्ट्रीयातील मिलस्टॅट तलावाजवळचं. आकाशातून येणारे भलेमोठे ढग आणि त्यातून चक्क धबधब्यासारखं कोसळणारं पाणी पाहून आपल्या अंगावर काटा उभा राहतो. फरहान अख्तरने टाईमलॅप्स फॉरमॅटमध्ये हा व्हिडीओ शेअर केला आहे. सोशल मीडियावर या व्हिडीओला काही वेळातच लाखो व्ह्युज मिळाले होते. दिवसभर हा व्हिडीओ झपाट्याने व्हायरल होतो आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -