घरमनोरंजनबघा आता अंकल म्हणतात, 'चाय पिलो...'

बघा आता अंकल म्हणतात, ‘चाय पिलो…’

Subscribe

चाय पिलो या आंटीनंतर आता हा परदेशी पाहुणा चहाचा घोट घेतो आणि चाय पिलो आंटीसारखाच 'हॅलो फ्रेंडस चाय पिलो' असं म्हणतो. हा व्हिडीओ युट्युबवर कोणीतरी अपलोड केल्यानंतर इन्स्टाग्राम, फेसबुक सगळीकडे हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर कोणता व्हिडिओ कधी व्हायरल होईल काही सांगता येत नाही. गेली काही दिवस ‘चाय पिलो आंटी’ चे काही व्हिडीओ व्हायरल होत असताना आता एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच गाजत आहे.काय आहे हा व्हिडिओ बघा

- Advertisement -

(सौ. युट्युब)

परदेशी अंकल म्हणतात, ‘चाय पिलो’

हा व्हिडिओ बघून तुम्हाला नक्कीच तो वारंवार बघावासा वाटला असेल. कारण चाय पिलो या आंटीनंतर आता हा परदेशी पाहुणा चहाचा घोट घेतो आणि चाय पिलो आंटीसारखाच ‘हॅलो फ्रेंडस चाय पिलो’ असं म्हणतो. हा व्हिडिओ युट्युबवर कोणीतरी अपलोड केल्यानंतर इन्स्टाग्राम, फेसबुक सगळीकडे हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

- Advertisement -

कोण आहे ही ‘चाय पिलो आंटी’

हॅलो फ्रेंडस चाय पिलो म्हणणाऱ्या या बाईचा व्हिडिओ आल्यानंतर अवघ्या काहीच काळात तिला सगळ्यांनी ट्रोल केले. कोणी नुसत्याच विनोदी अंगाने तिला ट्रोल केले. तर काहींनी तर तिला सोशल मीडियावरुन या व्हिडिओवरुन टार्गेट केले आहे. सोमावती महावर असे या महिलेचे नाव असून सोमावती महावर पापे वाली नावाचे तिचे युट्युब चॅनेल आहे. तुम्ही तिचे व्हिडीओ पाहिलेत तर एक लक्षात येईल की, तिचा चाय पिलो हा डायलॉग गाजला असला तरी  तिने अगदी डान्सपासूनचे सगळे व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत. जे बघून तुम्हाला नक्कीच हसायला येईल.


(सौ. सोमावती महावर पापेवाली)

सोशल मीडिया हिट होण्याचा प्लॅटफार्म

हल्ली सोशल मीडिया हा हिट होण्याचा फुकट प्लॅटफॉर्म आहे. त्यामुळे  प्रत्येकजण या माध्यामातून सोशल मीडियावरुन व्यक्त होत असतात. आपले वेगवेगळे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट होत असतात. टॅलेंट शोकेस करताना अनेकदा हे फनी व्हिडिओज बनतात, मग काय असे व्हिडिओज अधिक व्हायरल होतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -