घरट्रेंडिंगभारतीय बनावटीचा मायक्रोप्रोसेसर लष्कराला करणार मदत

भारतीय बनावटीचा मायक्रोप्रोसेसर लष्कराला करणार मदत

Subscribe

मेक इन इंडिया अंतर्गत आयआयटी मद्रासनं पहिल्यांदाच भारतात मायक्रोप्रोसेसरची निर्मिती केली आहे. भारतात तयार झालेला हा मायक्रोप्रोसेसर आता भारतीय संरक्षण क्षेत्रात आणि अणु संशोधन केंद्रात वापरला जाणार आहे.

सध्या मेक इन इंडियाचा जमाना आहे. याच मेक इन इंडिया अंतर्गत आयआयटी मद्रासनं पहिल्यांदाच भारतात मायक्रोप्रोसेसरची निर्मिती केली आहे. भारतात तयार झालेला हा मायक्रोप्रोसेसर आता भारतीय संरक्षण क्षेत्रात आणि अणु संशोधन केंद्रात वापरला जाणार आहे. आयआयटीनं तयार केलेला हा मायक्रोप्रोसेसर आंतरराष्ट्रीय दर्जाचा आहे. यापूर्वी ‘शक्ती’ या वर्गातील चंदीगडमध्ये पहिला मायक्रोप्रोसेसर तयार करण्यात आला होता.

इस्त्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन केंद्रानं त्याची निर्मिती केली होती. त्यानंतर आज आयआयटी मद्रासनं मायक्रोप्रोसेसरची निर्मिती केली आहे. सर्व चाचण्याअंती भारतीय संशोधन क्षेत्रात आणि अणु वैज्ञानिक क्षेत्रात या मायक्रोप्रोसेसरचा वापर केला जाणार आहे. दरम्यान, नव्या मायक्रोप्रोसेसरच्या शोधामुळं मोठा फायदा होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -