घरट्रेंडिंग'मेरा परिवार भ्रष्ट परिवार' भाजपच्या टॅगलाईनवर राष्ट्रवादीचा हल्लाबोल

‘मेरा परिवार भ्रष्ट परिवार’ भाजपच्या टॅगलाईनवर राष्ट्रवादीचा हल्लाबोल

Subscribe

भाजप पक्ष निवडणुकीच्या अनोख्या प्रचारासाठी चांगलाच प्रसिद्ध आहे. २०१४ साली त्यांनी ‘अब की बार, मोदी सरकार’ अशी टॅगलाईन देऊन देशातल्या सर्वच पक्षांची सुट्टी केली होती. त्याप्रमाणे २०१९ साठीही भाजपने ‘मेरा परिवार भाजप परिवार’ असा राष्ट्रव्यापी उपक्रम हाती घेतला आहे. मात्र निवडणुकीचा माहोल गरम होण्याआधीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोशल मीडिया टीमने या टॅगलाईनवर हल्लाबोल केलाय. ‘मेरा परिवार भ्रष्ट परिवार’ असं म्हणत भाजपच्या टॅगलाईनची हवा काढण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीने केला आहे.

मेरा परिवार, भाजप परिवार हा उपक्रम १२ फेब्रुवारी ते २ मार्च पर्यंत चालणार आहे. यादरम्यान देशातील पाच कोटी घरावर भाजपचे झेंडे लागणार असल्याचे अमित शाह यांनी सांगितले आहे. मात्र २०१४ च्या निवडणुकीत फटका बसलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही यावेळी भाजपला तोडीसतोड उत्तर देण्याची तयारी दर्शवली आहे. त्याचाच एक भाग म्हणून दोन्ही पक्षांच्या सोशल मीडिया हँडलवरून भाजपच्या प्रत्येक कृतीवर टीका करण्यासाठी मिम्स, कार्टून, क्रिएटिव्ह टॅगलाईन, नवीन हॅशटॅग तयार केले जात आहेत.

- Advertisement -

#MeraParivarBhrashtaParivar हा हॅशटॅग वापरून राष्ट्रवादीनेही भाजप विरोधात सोशल मीडियावर कंबर कसली आहे. भाजप सरकारच्या काळात राज्यातील १६ मंत्र्यांचा ९० हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार उघडकीस आल्याचा आरोप राष्ट्रवादीने आपल्या ट्विटरवर केला आहे.

- Advertisement -

भाजप सरकारने कितीही जुमलेबाजी केली तरी भाजपच्या मंत्र्यांचे घोटाळे कसे पाठिशी घालणार असा देखील प्रश्न ट्विटरच्या माध्यमातून उपस्थित केला आहे.

भाजपने आगामी लोकसभेसाठी जोरदार प्रचाराला सुरुवात केली. नमो अॅप, विविध वेबसाईट, मोदी टीशर्ट, मोदी मास्क आणून तरुणांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. मात्र विरोधी पक्षांकडूनही कोणतीही कसूर सोडलेली दिसत नाही. काँग्रेसकडून प्रियांका गांधी या मैदानात उतरल्या आहेत. त्यांचे ट्विटर अकाऊंटही नुकतेच वेरिफाईड झाले. राहुल गांधीसोबत त्यादेखील आता सोशल मीडियावर सक्रिय होतील. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेतेही सोशल मीडियावर नवनव्या कल्पना घेऊन भाजपवर टीका करताना दिसत आहेत.

 

राष्ट्रवादीचे सोशल शिलेदार

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील एक आगळावेगळा उपक्रम हाती घेतला आहे. सोशल मीडियावर पक्षाची प्रभावीपणे बाजू मांडणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यासाठी, त्यांच्या पाठिवर कौतुकाची थाप टाकण्यासाठी ‘शिलेदार राष्ट्रवादीचे’ असे बिरूद देऊन त्यांचा सन्मान केला जात आहे. यामुळे इतर कार्यकर्ते देखील हिरीरीने पक्षाची बाजू सोशल मीडियावर मांडताना दिसत आहेत.

आशिष मेटे यांचं शिक्षण बीई झालं असून, २००७ पासून ते आपल्या पक्षात सक्रियपणे काम करत आहेत. युवक संघटना व समाजमाध्यमांवर…

Posted by Jayant Patil – जयंत पाटील on Monday, 11 February 2019

Kishor Gaikwadhttps://www.mymahanagar.com/author/kishor/
एकेकाळी कार्यकर्ता होतो (कोणता ते विचारू नका) आता पत्रकार झालोय. तटस्थ वैगरे आहेच. पण स्वतःला पुरोगामी वैगरे म्हणवून घेतो. तसा राहण्याचा प्रयत्नही करतो. लिहायला, वाचायला, फिरायला आवडतं. सध्या सर्व वेळ टोरंटवर जातोय. बाकी इथे लिहितच राहिल. नक्की वाचा... आपला मित्र किशोर गायकवाड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -