घरट्रेंडिंगVideo: हत्तीच्या पिल्लाची पहिलं पाऊल टाकण्याची धडपड पहा

Video: हत्तीच्या पिल्लाची पहिलं पाऊल टाकण्याची धडपड पहा

Subscribe

नवजात हत्तीच्या पिलाचे पहिले पाऊल उचलण्याचा प्रयत्न करतानाचा एक मनमोहक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

एक नवा जीव भूतलावर जन्म घेतो आणि बऱ्याच प्रयत्नानंतर पहिले पाऊल टाकण्याची धडपड करतो. अशाच एका नवजात हत्तीने पहिले पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला आहे. असा हा मोहक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणावर व्हायरल होत आहे. भारतीय वन सेवा अधिकाऱ्याने ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर केला आहे, या व्हिडिओमध्ये नवजात हत्तीची पहिली चाल नक्की कशी दिसते हे पहायला मिळत आहे.

भारतीय वन सेवा अधिकारी सुशांत नंदा यांनी ६ फेब्रुवारीला ट्विटरवर २ सेकंदाची ही क्लिप शेअर केली आहे. “या छोट्याश्या टप्प्याने हजारो मैलांचा प्रवास सुरू होतो”, असे कॅप्शनमध्ये लिहिले आहे. या व्हिडिओमध्ये नुकतेच जन्मलेले हत्तीचे पिल्लू पहिले पाऊल उचलण्याचा कसोशीने प्रयत्न करत आहे. ते जमिनीवर हळू हळू पाउल टाकत स्वत:ला सावरत आहे. तसेच जमिनीवर पडूनही हार मानण्यास तयार नाही. ते पिल्लू पुन्हा पुन्हा चालण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच कॅप्शनमध्ये भारतीय वन सेवा अधिकारी सुशांत नंदा यांनी हे देखील स्पष्ट केले आहे की, नवजात हत्तीला उभे राहण्यासाठी एक तास आणि इतरत्र फिरण्यासाठी आणखी काही तास लागतात. तसेच हत्ती जन्मावेळी ३ फूट इतका असतो, तर ९० टक्के हत्तींचे जन्म हे रात्रीच्या वेळी होतात.

- Advertisement -

नेटकऱ्यांची व्हिडिओला मोठ्याप्रमाणावर पसंती

या व्हिडिओला नेटकऱ्यांकडूनही मोठ्याप्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. हत्तीची मनमोहक चाल नेटकऱ्यांना आवडली असून काहीजण व्हिडिओ पाहून आश्चर्य व्यक्त करत आहेत. तर काही जणांना व्हिडिओ फारच आवडला आहे, अशा एक ना अनेक वेगवेगळ्या स्वरूपाच्या प्रतिक्रिया व्हिडिओवर येत आहेत. आतापर्यंत या व्हिडिओला ९ हजारापेक्षा जास्त विव्ज मिळाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -