घरट्रेंडिंगपतीचा पबजीला विरोध; पत्नीने थेट घटस्फोटच मागितला

पतीचा पबजीला विरोध; पत्नीने थेट घटस्फोटच मागितला

Subscribe

पबजी गेमने संबंध जगभरात धुमाकूळ घातला आहे. पबजी खेळणाऱ्याला या गेममधून आत्मिक समाधान मिळत असले तरी त्याच्या कुटुंबियांना मात्र मोठा त्रास सहन करावा लागत आहे. युएईमध्ये पबजीमुळे एका माणसाचा संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आला आहे. पबजीचे व्यसन लागलेल्या एका २० वर्षीय तरुणीने आपल्या पतीविरोधात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला आहे. पबजी गेम खेळण्यास विरोध केला, म्हणून या शुल्लक कारणासाठी पत्नीने हा घटस्फोटाचा दावा केला आहे.

युईएच्या अजमान पोलीस स्थानकातील सामाजिक विभागाकडे हे प्रकरण आहे. तिथले कॅप्टन वफा खलील या प्रकरणावर देखरेख करत आहेत. गल्फ न्युजशी बोलताना त्यांनी सांगितले की, “सदर तरुणीने पबजी खेळणे हा तिचा अधिकार असल्याचे सांगितले आहे. पबजी खेळणे हा माझा मनोरंजनाचा अधिकार असून त्यातून मला समाधान मिळते, त्यामुळे मला पबजी खेळण्यापासून कुणीही रोखू शकत नाही.” पबजीमुळे नवरा-बायकोत कडाक्याचे भांडण झाल्यानंतर तिने पोलिसांत जाऊन तक्रारही दाखल केली होती.

- Advertisement -

हे वाचा – रामकृष्ण हरी! बायको पेक्षी पबजी भारी

कॅप्टन वफा खलील म्हणाले की, ऑनलाईन गेममुळे इतक्या टोकाचे मतभेद होण्याचे हे पहिलेच प्रकरण आमच्यासमोर आले आहे. आपल्या खेळण्याच्या व्यसनाचे समर्थन करताना तिने सांगितले की, “आपण कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत हा गेम खेळत नाही. फक्त मित्र आणि कुटुंबियासोबतच मी पबजी खेळते.”

- Advertisement -

खरंतर हे प्रकरण अतिशय साधे होते. आपली बायको लवकरच पबजीच्या आहारी जाईल. पबजीच्या विळख्यात अडकल्यास पत्नी म्हणून पार पाडायची आपली कर्तव्ये ती विसरू शकते, अशी भीती नवऱ्याला सतावत होती. त्यामुळेच पबजी खेळण्यापासून तो तिला रोखू लागला होता. याविषयी बोलताना नवऱ्याने सांगितले की, मला बायकोच्या स्वातंत्र्याचे हनन करायचे नाही. मला फक्त माझे कुटुंब एकत्र ठेवायचे आहे. मात्र माझ्या विरोधामुळे पत्नी इतका टोकाचा निर्णय घेईल असे मला कधीही वाटले नव्हते, अशी प्रतिक्रिया नवऱ्याने दिली आहे.

हे ही वाचा – भारतात पबजीचे नवे अपडेट, तर प्राइन सेवा लाँच

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -