घरट्रेंडिंगStay Home Stay Empowered: अनावश्यक शॉपिंग एक मानसिक आजार

Stay Home Stay Empowered: अनावश्यक शॉपिंग एक मानसिक आजार

Subscribe

तरुण पिढीमध्ये शॉपिंगचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. पार्टी, सोहळा, समारंभ, वाढदिवशीनिमित्त शॉपिंग नाही तर मज्जा नाही असे तरुणांचे मत असते. त्यामुळे टेंशन दुर करण्यास शॉपिंग उत्तम उपाय बनत आहे. जरासेही टेंशन आले तरी मित्रांमैत्रिणींसोबत शॉपिंग करण्यात वेळ घालवणे अनेकजण पसंत करतात. परंतु सतत शॉपिंग करण्याची ही सवय एक दिवस आपल्या ताणतणावाचे मुख्य कारणही ठरु शकते. मत मानसशास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे. धावपळीच्या दुनियेत स्वत:कडे लक्ष देण्यासाठी वेळ नसतो. रोज ऑफिस, काम, घर असे करुन अनेकांना वैताग आलेला असतो. परंतु सुट्टीच्या दिवशी किंवा एखाद दिवस काढून शॉपिंगचा प्लान झाला तर मुड प्रेश होतो. रोजच्या कटकटीतून मन दुसरीकडे वळवण्यासाठी शॉपिंग बेस्ट ऑप्शन असते. त्यामुळे अनेकांना शॉपिंग करणे म्हणजे ताणतणाव कमी करणारे स्ट्रेस बस्टर वाटते.

सतत आपल्या ऑफिस, व्यावसायिक कामात व्यक्त असणाऱ्यांना बाहेरच्या जगात वातावरणात काय घडते याची माहिती नसते. जी माहिती मिळते ती वृत्तपत्रे, मॅग्जीन किंवा मग इंटरनेटवर, त्यामुळे आपण प्रवाहाबाहेर फेकले जाणार नाही न अशी भीती अनेकांना असते. काही गोष्टींची माहितीच नसल्याने लोकांच्या गर्दीत बसण्यास घाबरतात. परंतु शॉपिंग पर्याय अशांचा मुड बदलण्यास मदत करते. आत्मविश्वास वाढण्यास मदत करते. शॉपिंगदरम्यान आवडणाऱ्या मनासारख्या वस्तू खरेदी करण्यास मिळत असल्याने डोक शांत राहते. आता काय घ्यायचे, नवीन काय आले का बघू या विचारांमुळे मनातील कटू आठवणींना यावेळी विसर पडतो. आपल्या आवडणाऱ्या व्यक्तींसाठी केलेली शॉपिंगमधून अजूनच आनंद मिळत असतो. महिलांमध्ये शॉपिंग करण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. अनेक महिला कुटुंबाचा विचार करुन शॉपिंग करतात. कुटुंबातील प्रत्येकासाठी काय तरी आवडीचे घ्यायचे यासाठी त्या आग्रही असतात. वस्तूची तारीख, वापराची मुदत बघत शॉपिंग करत असल्याने महिलांना शॉपिंगसाठी खूप वेळ लागतो. या खरेदी केलेल्या वस्तूंच्या माध्यमांतून सुख- दु:ख वाटले जाते. सध्या विभक्त कुटुंब पद्धती वाढत असल्याने अनेकांना घरात एकटेपणा जाणवतो. अशांना शॉपिंगच्या माध्यामातून इतरांना भेटण्याची व्यक्त होण्यासाठी वेळ मिळतो. व एकटेपणा घालवला जातो.

- Advertisement -

परंतु सतत शॉपिंग करण्याची सवय एकदिवस तुमचे आजाराचे कारणही ठरु शकते. अनेक जण लोकांना दाखवण्यासाठी शॉपिंग करतात. त्यामुळे ही शॉपिंगची सततच्या सवयीमुळे आपल्याला शॉपिंग फोबिया होऊ शकतो असे मत मानसशास्त्रज्ञांनी मांडले आहे. यामध्ये व्यक्ती दुसऱ्यांची शॉपिंग बघून डिप्रेशनचे शिकार होतात. तर दुसऱ्यांनी केलेल्या शॉपिंगसोबत तुलना करु लागतात. सध्या क्रेडिट कार्ड, पर्सनल मनी फ्रेंडच्या माध्यामातून शॉपिंग करण्यास अनेक जण पसंती देतात. परंतु यावेळी पैसे आहेत की नाहीत याचे विचार न करता प्रमाणाच्या बाहेर खरेदी करतात. नंतर शॉपिंगचे बिल भरण्याची वेळ येते तेव्हा जास्त बिल बघून अनेकांना धक्का बसतो. अनेक जण स्वत:चे समाधान होत नाही तोपर्यंत वस्तू खरेदी करत राहतात परंतु त्यांच्या नंतर लक्षात येते की आपण अनावश्यक वस्तूही खरेदी केल्या आहेत. त्यामुळे सतत शॉपिंग करण्याची ही सवय तुम्हाला आजाराचे निमंत्रण देत असते. त्यामुळे या सवयीपासून बचाव करण्यासाठी व्यायाम, योगासने, ध्यान धारणा करावी असे मत मानसशास्त्रज्ञ व्यक्त करतात.


 

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -