घरट्रेंडिंगब्राह्मण समाजावर टीकेमुळे ट्विटरचे सीईओ ट्रोल

ब्राह्मण समाजावर टीकेमुळे ट्विटरचे सीईओ ट्रोल

Subscribe

सोशल मीडियावर मायक्रोब्लॉगिंगसाठी ट्विटर ही साईट प्रसिद्ध आहे. सध्या एखाद्या व्यक्तीवर टीका करायची असल्यास सामुहिक पद्धतीने ट्विटरवर त्याला ट्रोल केले जाते. मात्र ट्रोलिंगचा फटका खुद्द ट्विटरचे सीईओ जॅक डोर्सी यांनाच बसला आहे. एका पत्रकाराने रविवारी एक फोटो ट्विट केला होता. ज्यामुळे भारतातून त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले आहे. या फोटोंमध्ये जॅक डोर्सी काही महिलांसोबत उभे असून त्यांच्या हातात एक पोस्टर आहे. या पोस्टरवर लिहिलेला मजकूर ब्राह्मण समाजाची बदनामी करणारा आहे, असा आरोप त्यांच्यावर लावला आहे. अनेकांनी यावर नाराजी व्यक्त केल्यानंतर आता ट्विटरनेही आपला माफीनामा सादर केला आहे.

- Advertisement -

ट्विटरचे सीईओ जॅक डोर्सी काही दिवसांपूर्वी भारत भेटीवर आले होते. यावेळी पत्रकार, कार्यकर्ते आणि लेखिकांच्या एका शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली होती. या भेटीचा फोटो अॅना नावाच्या महिला पत्रकारने रविवारी ट्विट केला. या फोटोमध्ये जॅक डोर्सी यांच्या हातात एक पोस्टर आहे. ज्यावर ‘Smash Brahminical Patriarchy’ असे लिहिले आहे. ‘ब्राह्मणी पितृसत्ताक पद्धतीला गाडून टाका’ या मजकूरामुळे ब्राह्मण समाजातून संतापजनक प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

- Advertisement -

ट्विटरवरच अनेकांनी आपली नाराजी व्यक्त केल्यानंतर ट्विटर इंडियाकडून अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आली आहे. जॅक डोर्सी यांची काही महिलांनी अनौपचारिक भेट घेतली होती. यावेळी एका दलित कार्यकर्तीने हे पोस्टर त्यांना दिले होते, असे ट्विटर इंडियाने सांगितले आहे. तसेच ट्विटरच्या कायदे आणि धोरणतज्ज्ञ विजया गड्डे म्हणाल्या की, डोर्सी यांच्या फोटोबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करत आहोत. डोर्सी यांना ते पोस्टर गिफ्ट म्हणून मिळाले होते. यावेळी त्या शिष्टमंडळासोबतचा फोटो खासगी सदिच्छानिमित्त काढलेला होता. आम्हाला आणखी जबाबदारीपुर्वक वागण्याची गरज असल्याचे विजया गड्डे म्हणाल्या.

या पोस्टरला ट्रोल केल्यानंतर महिलांच्या शिष्टमंडळाकडूनही याला प्रत्युत्तर देण्यात आले आहे. हे पोस्टर बनवण्यामागे भारतातील लिंगभेद दाखवण्याचा प्रयत्न आम्ही केला होता. मात्र जातीयवादी लोक यावर टीका करुन आम्ही उपस्थित केलेल्या मुद्द्याला बगल देत असल्याचे दलित दिवा या ट्विटर हँडलवर सागंण्यात आले आहे.

मागच्या आठवड्यात जॅक डोर्सी यांनी भारत भेटीदरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद अशा राजकीय नेत्यांसहित अनेकांची भेट घेतली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -