घरट्रेंडिंगCovid-19 पासून बचावासाठी कुठे कोणता मास्क घालावा, वाचा सविस्तर

Covid-19 पासून बचावासाठी कुठे कोणता मास्क घालावा, वाचा सविस्तर

Subscribe

सध्या देशभरात कोरोनाचा कहर सुरू आहे. अशा वेळी कोरोनाची बाधा होऊ नये म्हणून नियमांचे पालन करणं बंधनकारक आहे. अशातच सोशल डिस्टन्सिंग ठेवणे, सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे, सतत पाण्याने किंवा सॅनिटायझरने हात धुणे हे दैनंदिन सवयींपैकी एक झाले आहे. मात्र कोरोनापासून बचाव करण्यासाठी कोणतं मास्क वापरणं योग्य आहे? याबद्दल अजूनही मनात शंका आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाची पहिली लाट असो किंवा दुसरी लाट असो, याविरूद्ध लढा देण्यासाठी शस्त्राप्रमाणे मास्कने काम केले आहे.

मास्क घातल्यानंतर आजही अनेकजण तक्रारी करताना दिसताय. जसे की, मास्क घातलं की श्वास घेण्यास अडथळा येतो, चालताना धाप लागते. मात्र ही लहान समस्या आहे. कोरोनाचा संसर्ग होण्यापेक्षा त्यापासून बचाव होण्यासाठी मास्क घालणं हा सोयिस्कर पर्याय आहे. कोरोना महामारीच्या जीवघेण्या परिस्थितीत, मास्क सारखे शस्त्र कधी, कुठे आणि कसे वापरावे हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे. म्हणून मास्क संबंधित आपल्या सर्व मनातील शंकाचं निरसन एमडी डॉ. फहीम युनुस यांनी केले आहे. वाचा सविस्तर

- Advertisement -

कोणतं मास्क घालणं आहे योग्य ?

साधारण हा प्रश्न बहुतेक लोकांच्या मनात असेल की, बाहेर पडताना कॉटन मास्क, सर्जिकल मास्क वापरावं की अजून कोणता वेगळा मास्क योग्य राहिल? तर या प्रश्नाचे उत्तर असे आहे की, घराबाहेर पडताना N95/KN95 किंवा सर्जिकल मास्क वापरावे. हे मास्क जोपर्यंत खराब होत नाही किंवा ते सैल होत नाही, तोपर्यंत हे मास्क तुम्ही वापरू शकता. हे मास्क सैल झाल्यानंतर ते मास्क वापरू नका, कारण अशावेळी ते तुमचे नाक आणि तोंड संरक्षित ठेवू शकत नाही.

कोणत्या ठिकाणी कोणतं मास्क वापरावे?

कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेदरम्यान, डॉक्टरांनी दुहेरी मास्क वापरा असे सांगितले होते. गर्दीच्या ठिकाणी तुम्ही जर दुहेरी मास्क (डबल मास्क) घातले तर नाक आणि तोंडाद्वारे कोरोनाचे विषाणू शरीरात जाण्यापासून रोखण्यास मदत होते. डॉ. फहीम युनुस यांच्या मते, जास्त धोका असलेल्या ठिकाणी जाताना डबल मास्कचा वापर चांगला आहे. जर तुम्ही हॉस्पिटल, फॅक्टरी, कार्यालयात किंवा सार्वजनिक वाहतुकीचा वापर करत असाल तर चेहरा दुहेरी मास्क लावून सुरक्षित ठेवा. ज्या ठिकाणी कोरोनाचा संसर्ग कमी असेल किंवा जे हॉटस्पॉट नाही अशा ठिकाणी तुम्ही सिंगल मास्क घालू शकतात. अशा वेळी तुम्ही कॉटन मास्क किंवा सर्जिकल मास्क देखील घालू शकतात.


Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -