घरट्रेंडिंगनव्या हेअर स्टाईलच्या नादात झालं होत्याचं नव्हतं! व्हिडिओ बघा, तुम्हीही व्हाल हैराण

नव्या हेअर स्टाईलच्या नादात झालं होत्याचं नव्हतं! व्हिडिओ बघा, तुम्हीही व्हाल हैराण

Subscribe

बघा व्हायरल होणारा व्हिडिओ

बदलती जीवनशैली जगत असताना त्या जीवनशैलीशी जुळवून घेताना अनेकदा सोशल मीडियावर दाखवणारे व्हिडिओ किंवा टिप्स कित्येकांकडून फॉलो केल्या जातात. मात्र वॉशिंगटनमध्ये असा काही प्रकार घडला की त्या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलेल्या टेसिका ब्राउन नावाच्या महिलेने तिच्या केसांना नवा लूक देण्याच्या नादात अनेक वेगवगळ्या ट्रिक्स केल्या. यापैकी एक ट्रिक म्हणजे तिने नवी हेअरस्टाईल करण्यासाठी वापरली पण झाले असे काही की तुम्ही जाणून घेतल्यानंतर हैराण व्हाल नक्की….टेसिका ब्राउन नावाच्या महिलेने गोरिल्ला ग्लू हेअर स्प्रेचा वापर करून आपला नवा लूक केला. मात्र या नव्या हेअर स्टाईलच्या नादात झालं होत्याचं नव्हतं झाल्याचं समोर आले आहे.

- Advertisement -

असा घडला प्रकार

टेसिका ब्राउनने गोरिल्ला ग्लू हेअर स्प्रेचा वापर करून आपली हेअर स्टाईल बदलली. मात्र या गोरिल्ला ग्लू हेअर स्प्रेचा वापर केल्याने तिचे केस चांगलेच चिटकले. या चिटकलेल्या केसांमुळे टेसिका ब्राउन खूप नाराज झाली होती. आपले केस परत कसे पूर्ववत होतील यासाठी तिने अनेक प्रयत्न केले. ते नीट होण्यासाठी तिला तब्बल एक महिना लागला. मात्र अद्याप तिचे केस पूर्वी सारखे झाले नाही. जेसिकाला आपले चिटकलेले केस सोडण्यासाठी बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला. यासाठी तिने अनेक दिग्गज डॉक्टरांची मदत देखील घेतली. या घडलेल्या प्रकाराबद्दल जेसिकाने स्वतःहा खुलासा करत सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला. या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओला नेटिझन्सने पसंती दिली असून यावर कमेंट्सचा वर्षाव देखील केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tessica (@im_d_ollady)

- Advertisement -

हा व्हिडिओ पाहून काही नेटकरी जेसिकाला चांगलेच ट्रोल करत आहे तर काहींनी तिच्याबद्दल चिंता देखील व्यक्त केली आहे. यासह काहींनी तिला असा प्रयोग पुन्हा करू नको असा सल्ला दिला काहींनी तिला या समस्येतून कसं बाहेर पडता येईल याच्या टीप्स देखील दिल्या आहेत.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -