घरUncategorizedRPF जवानानं वाचवले प्रवाशाचे प्राण, घटनी CCTVमध्ये कैद

RPF जवानानं वाचवले प्रवाशाचे प्राण, घटनी CCTVमध्ये कैद

Subscribe

धावती ट्रेन पकडण्याच्या नादात प्रवासी ट्रेन खाली आला. पण आरपीएफ जवानानं त्याचे प्राण वाचवले. ही सारी घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

धावती ट्रेन पकडू नका अशा सुचना वारंवार रेल्वेकडून केल्या जातात. पण, त्यानंतर देखील प्रवाशांकडून या सुचनांकडे दुर्लक्ष होते. आत्तापर्यंत अनेक जणांना धावती ट्रेन पकडण्याचा नादात आपला जीव गमवावा लागला आहे. तर काही जण आश्चर्यकारकरित्या बचावलेले देखील आहेत. अशाच प्रकारे झालेल्या चमत्काराचा एक व्हिडीओ समोर आला असून आरपीएफ जवान त्या प्रवाशासाठी देवदूत म्हणून धावून आला आहे. तामिळनाडूतील एगमोर रेल्वे स्थानकातील ही घटना सीसीटीव्हीच्या माध्यमातून समोर आली आहे.धावती ट्रेन पकडण्याचा नादात एका प्रवाशाचा तोल गेला. मात्र RPF जवानानं या प्रवाशाचे प्राण वाचवले आहेत. ही सारी घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

- Advertisement -

एगमोर रेल्वे स्थानकावर धावती ट्रेन पकडताना प्रवासी रेल्वेगाडी खाली येत असल्याची बाब आरपीएफ जवानाच्या ध्यानात आली. त्यानंतर त्या जवानानं फरफटत जाणाऱ्या प्रवाशाला बाहेर खेचलं. म्हणून त्या प्रवाशाचे प्राण वाचले.

‘माय महानगर’चे आवाहन

धावती ट्रेन पकडणं केव्हाही धोक्याचे. त्यामध्ये अनेकांनी आजवर आपले प्राण गमावले आहेत. त्यामुळे तुम्ही देखील धावती ट्रेन पकडण्याचा प्रयत्न करू नका. घरी तुमची कुणीतरी वाट पाहत आहे ही गोष्ट कायम ध्यानात असू द्या. त्यामुळे प्रवास करताना काळजी घ्या. असं आवाहन ‘माय महानगर’ तुम्हाला करत आहेत.

वाचा – गुजरातच्या सचिवालयात घुसला बिबट्या; सीसीटीव्हीत कैद

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -