Eco friendly bappa Competition
घर Uncategorized My Mahanagar video असे व्हिडिओ ज्यांना मिळाली लाखोंची पसंती

My Mahanagar video असे व्हिडिओ ज्यांना मिळाली लाखोंची पसंती

Subscribe

माय महानगरच्या सामाजिक आणि राजकीय बातम्यांना जसा उदंड प्रतिसाद मिळतो, त्याच पद्धतीचे भरभरून असे प्रेम नेटकरांनी माय महानगरच्या व्हिडिओवरही केले आहे. समाजात आणि सभोवताली घडणाऱ्या घटनांचे एक्सक्लुसिव्ह व्हिडिओ शोधून प्रेक्षकांसाठी सादर करण्याचे विशेषपण गेल्या तीन वर्षांच्या प्रवासात माय महानगरने नेहमीच जपले आहे. या व्हिडिओसाठीचा प्रतिसाद म्हणजे माय महानगरच्या अनेक व्हिडिओला नागरिकांनी पसंती दिली. अनेक व्हिडिओ तुफान व्हायरल होतानाच या व्हिडिओला शेअर्स, लाईक्ससह मोठ्या प्रमाणात कमेंट्सही मिळाले. माय महानगरच्या या व्हिडिओची चर्चा ही नेहमीच राहिले. मग राज्यातील राजकारणाचा विषय असो बातम्यांचे ग्राऊंड रिपोर्टिंग असो वा एखाद्या घटनेचे वृत्तांकन असो माय महानगरने आपली वेगळीच अशी स्टाईलशीट कायम ठेवली आहे. विशेष मुलाखती, वेगळ्या धाटणीचे विषय असो किंवा एखाद्या समस्येची मांडणी असो यासारख्या विषयामुळेच माय महानगरचे व्हिडिओ वेगळेपण कायम चर्चेत राहिले आहे. माय महानगरच्या अशाच व्हिडिओची दखल अनेकदा प्रशासनाला घ्यावी लागली आहे. त्यामुळे माय महानगरच्या अनेक व्हिडिओचे इम्पॅक्टही घ्यावा लागणे ही माय महानगरच्या बातमीदारीची दखल म्हणावी लागेल.

नाशिकच्या डॉ झाकीर हुसेन रूग्णालयात ऑक्सिजन गळती झाल्यानंतर ऑन द स्पॉट अशा पद्धतीचे वृत्तांकन करणारे आणि रूग्णालयातील भीषण अवस्था दाखवणारे असे वृत्तांकन माय महानगरचे छायाचित्रकार आणि वार्ताहर यांनी केले होते. एखाद्या घटनेचे लाईव्ह रिपोर्टिंग करताना वास्तवदर्शी चित्र प्रेक्षकांना मांडण्याचा हा प्रयोग होता. महत्वाचे म्हणजे रूग्णालयात ऑक्सिजन अभावी तडफडून झालेल्या मृत्यूची भीषण अवस्था या व्हिडिओच्या माध्यमातून समोर आली. या घटनेचा व्हिडिओ लाखो युजर्सने पाहिला. नाशिकच्या डॉ झाकीर हुसैन हॉस्पिटलच्या या फेसबुक लाईव्हच्या व्हिडिओ हे ८० लाखांहून अधिक युजर्सने पाहिले.

- Advertisement -

नाशिकच्या डॉ झाकीर हुसेन रूग्णालयात ऑक्सिजनअभावी रूग्णांचे हाल

नाशिकमधील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन टॅंक गळतीने रूग्णालयात उपचारासाठी दाखल रूग्णांचे ऑक्सिजन अभावी अतोनात हाल झाले. ऑक्सिजनचा पुरवठा विस्कळीत झाल्याने हार्ट पंप करण्याचा प्रयत्न हॉस्पिटल कर्मचारी आणि रूग्णांच्या नातेवाईकांकडून होत असताना दिसला.

Posted by आपलं महानगर – My Mahanagar on Wednesday, April 21, 2021

नाशिकमधील ऑक्सिजन टाकीला लागलेल्या गळतीमुळे २२ रुग्णांचा गुदमरुन मृत्यू

- Advertisement -

केव्हा अलायन्स होईल, अन् तुटेल काहीच सांगता येत नाही | Nitin gadkari aurangabad speech

शरद पवार यांच्या नुकत्याच गुजरात दौऱ्यामुळे महाराष्ट्राच राजकारण ढवळून निघाले. शरद पवार – अमित शहा भेटीमुळे महाराष्ट्रापासून ते दिल्लीच्या राजकारणात एकच चर्चा झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विधानामुळे या भेटीच्या चर्चेला आणखी खतपाणी मिळाले. त्यामुळेच महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार – अमित शहा भेटीचे पडसाद कॉंग्रेसच्या नाराजीच्या निमित्ताने पहायला मिळाले. शरद पवार एका चार्टर्ड प्लेनने अहमदाबाद येथे दाखल झाले होते. या भेटीमध्ये त्यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल यांचाही समावेश होता. शरद पवार यांच्या हवाई प्रवासाबाबतचा एक किस्सा याआधी नितीन गडकरी यांनी एका जाहीर सभेत सांगितला होता.

Posted by आपलं महानगर – My Mahanagar on Wednesday, April 7, 2021

 

राज्यात कोणाचा करेक्ट कार्यक्रम होणार? | Jitendra Awhad’s reply to Devendra Fadnavis

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवेढा येथे राज्यातील सरकारचा करेक्ट कार्यक्रम करतो, असं विधान केलं होतं. यावर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. त्यांनी करेक्ट कार्यक्रम हा शब्द वापरला. हा शब्दही चोरल्यासारखा वाटतो. हा शब्द नेमका कुणाचा आहे हे सर्वांना माहीत आहे, असं टोला जितेंद्र आव्हाड यांनी फडणवीसांना लगावला.

Posted by आपलं महानगर – My Mahanagar on Tuesday, April 13, 2021

 

आनंद शिंदेंचा देवेंद्र फडणवीसांना गाण्यातून टोला | Anand Shinde responded to Fadnavis with a song

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारात वातावरण तापलं आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सरकार बदलायचं माझ्यावर सोडा, असं विधान केल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी देखील याला उत्तर दिलं आहे. यात आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांना गाण्यातून उत्तर दिलं आहे.

Posted by आपलं महानगर – My Mahanagar on Monday, April 12, 2021

निकृष्ट जेवणावरुन बच्चू कडूंना राग अनावर | Bachchu Kadu slapped the chef

अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सर्वच रुग्णांना निकृष्ट दर्जाचे जेवण दिल जाते. त्यामुळे अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला अचानक भेट दिली. यावेळी बच्चू कडू यांनी पाहणी केल्यावर येथील जेवणाची व्यवस्था पाहिल्यावर त्यांचा संताप अनावर झाला. बच्चू कडू यांनी आपलं रौद्ररूप दाखवत आचाऱ्याच्या कानशिलात लगावली.

Posted by आपलं महानगर – My Mahanagar on Tuesday, April 6, 2021

 

मुनगंटीवारांचे टार्गेट आदित्य ठाकरे | Mungantiwar targets aditya thackeray

पर्यावरण विभागाला निधी न देता फक्त विभागाचे नाव बदलल्याच्या मुद्द्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी विभागाचे मंत्री आदित्य ठाकरे यांना टार्गेट केले. समृद्ध मुद्द्यावरही त्यांनी ठाकरे सरकारला चांगलेच चिमटे काढले. तसेच राज्यात फाईल निपटाऱ्याचा सध्याचा वेगदेखील त्यांनी सभागृहाच्या लक्षात आणून दिला. वृक्ष मुद्द्यावर चौकशी लावली तशीच नस्ती निपटाऱ्याच्या मुद्द्यावर लावता का ? असाही सवाल सुधीर मुनगंटीवार यांनी केला. राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना त्यांनी ठाकरे सरकारच्या कारभारावर अनेक मुद्द्यांवर टीकास्त्र सोडले.

Posted by आपलं महानगर – My Mahanagar on Sunday, March 14, 2021


 

- Advertisment -