घरUncategorizedविनेश फोगाटचा साखरपुडा?

विनेश फोगाटचा साखरपुडा?

Subscribe

सध्या जकार्ता येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या विनेश फोगाटने साखरपुड्याची अनाऊन्समेंट केली आहे. विनेशने ति चा लाईफ पार्टनर निवडला आहे. याबाबतची माहिती विनेशने स्वत: तिच्या इन्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केली आहे. २४ वर्षीय विनेशने इन्स्टाग्राम अकाउंटवर तिच्या जोडीदारासोबतचे फोटो शेअर केले आहेत. त्यामुळे सर्वत्र तिचीच चर्चा सुरू आहे.

कोण आहे विनेशचा लाईफ पार्टनर

विनेशच्या जोडीदाराचे नाव आहे सोमवीर राठी. सोमवीर हा उत्तराखंडमधील सोनीपत येथे राहतो. तो स्वत: कुस्तीपटू आहे. त्याने नॅशनल चॅम्पियनशिपम स्पर्धेत त्याने कांस्य पदक पटकावले आहे. सोमवीर राजस्थानमध्ये रेल्वेमध्ये टीटीईची नोकरी करतोय. विशेष म्हणजे विनेशदेखील रेल्वेमध्येच नोकरी करते. विनेशने याआधीदेखील सोमवीरसोबतचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

- Advertisement -

अफवांचे केले खंडन

दरम्यान, काही दिवसांपूर्वी एका वृत्तपत्राने विनेश आणि जेवलीन थ्रोअर नीरज चोप्रामध्ये जवळीक वाढली असल्याची बातमी केली होती त्यामुळे विनेश आणि नीरजबाबत लोकांमध्ये चर्चा सुरू झाली होती. परंतु आता विनेशच्या इन्स्टाग्राम पोस्टनंतर या सर्व चर्चांना विराम लागला आहे.

The best decision I ever made! Glad you pinned me for life ?❤️

A post shared by Vinesh Phogat (@vineshphogat) on

- Advertisement -

सध्या सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत विनेश फोगाटने महिला कुस्तीमध्ये सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. विनेश फोगाटने फ्री स्टाईल कुस्ती प्रकारामध्ये ५० किलो वजनी गटामध्ये सुवर्णपदक मिळवले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -