घरमुंबईभारतात जन्मलेल्या पहिल्या पेग्विंन पिल्लाचा मृत्यू

भारतात जन्मलेल्या पहिल्या पेग्विंन पिल्लाचा मृत्यू

Subscribe

भारतात जन्मलेल्या पहिल्या पेंग्विनचा मृत्यू झाला आहे. भायखळ्याच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात जन्मलेल्या पेंग्विनच्या पिल्लाची प्रकृती अचानक ढासळली आणि बुधवारी सायंकाळी त्याचा मृत्यू झाला. उद्यान प्रशासनाने आज त्याबाबतची माहिती जाहीर केली आहे.

वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात १५ ऑगस्टला जन्माला आलेल्या पेंग्विन पिल्लाचा मृत्यू झाला आहे.  भारतात पहिल्यांदाच  पेंग्विनने जन्म घेतला होता. २२ ऑगस्ट म्हणजेच बुधवारी या पिल्लाचा मृत्यू झाल्याची माहिती जिजाबाई उद्यानातून देण्यात आली आहे. मुंबईतील हवामान या पेंग्विन्सना मानवणार नाही, अशी चर्चा सुरुवातीपासूनच होती. बुधवारी या पिल्लाची प्रकृती ढासळल्याचं निदर्शनास आले. हम्बोल्ट पेंग्विन व्यवस्थापन करणाऱ्या पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या पथकाने सर्व प्रयत्न करुन देखील दोन दिवसापूर्वी हे पिल्लू मृत अवस्थेत आढळले. मुंबईच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयातील पॅथॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी आणि पक्षीतज्ज्ञ या विभागातील तज्ज्ञांनी दुसऱ्या दिवशी सकाळी प्राणीसंग्रहालयाच्या रुग्णालयात या पिल्लाचं शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदनाच्या अहवालात यकृतातील बिघाडामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला.

या कारणांमुळे होतो पिल्लांचा मृत्यू 

बऱ्याचदा अंडी आणि पिल्ले मृत होण्याचे सरासरी प्रमाण ६० टक्के इतके असते. 
ज्यामध्ये अंडी फलित नसणे, अंड्यामध्ये पिल्लाची स्थिती योग्य नसणे.
अंड्यातून पिल्लू स्वत: बाहेर नं येणे. 
पिल्लाला अन्न भरवण्याबाबत पिल्लांची असमर्थता
अंड्यातील पिवळा बलक तसाच राहणे. 
अल्बुमिनचा साका तयार होणे. 

- Advertisement -

पेंग्विनच्या जन्मावेळी त्याचा बाबा असलेल्या मोल्ट पेंग्विनमध्ये चलबिचल पाहायला मिळाली होती. मुंबईच्या भायखळा येथील राणीबाग म्हणजेच वीर जिजामाता भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहालयात दोन वर्षांपूर्वी आठ हम्बोल्ट पेंग्विन आणण्यात आले होते. त्यापैकी एका मादीचा मृत्यू झाला होता. उरलेल्या सात पैकी नर असलेल्या मोल्ट (तीन वर्षे) आणि त्याची जोडीदार मादी असलेली फ्लिपर (साडेचार वर्षे) या जोडीने ५ जुलैला एक अंडे दिले होते. या अंड्याला ४० दिवस पूर्ण झाल्यावर भारताच्या स्वातंत्रदिनी (१५ ऑगस्टला) सायंकाळी ८ वाजून २ मिनिटांनी एका बेबी पेंग्विनचा जन्म झाला आहे. तो जन्माला आल्यावर तो नाजूक असल्याने रात्रभर त्याला निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते. पण, आता या पिल्लाचा मृत्यू झाल्यामुळे मुंबईकरांचा या पेंग्विन पिल्लाला पाहण्याचा चान्स मात्र हुकला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -