घरव्हिडिओआदित्य ठाकरेंच्या सभेची परवानगी नाकारल्यामुळे ठाकरे - शिंदे आमनेसामने

आदित्य ठाकरेंच्या सभेची परवानगी नाकारल्यामुळे ठाकरे – शिंदे आमनेसामने

Related Story

- Advertisement -

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि उपनेत्या सुषमा अंधारे यांची सभा रद्द केल्यामुळे ठाकरे गट आणि शिंदे गट पुन्हा आमनेसामने आले आहे. आदित्य ठाकरे यांची बुलढाणा आणि सिल्लोडमधली सभा रद्द केली. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघात सभा होणार होती. यावेळी सत्तार यांचीसुद्धा सभा होती. कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी ठाकरे गटाच्या सभेला परवानगी नाकारण्यात आली. यानंतर आदित्य ठाकरेंनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन संवाद साधण्याचा इशारा दिला आहे.

- Advertisement -