घरव्हिडिओकोरोना रुग्णांसाठी रक्तदान; नेवरे गावकऱ्यांचा उपक्रम

कोरोना रुग्णांसाठी रक्तदान; नेवरे गावकऱ्यांचा उपक्रम

Related Story

- Advertisement -

कोतवडे जिल्हा परिषद गट आणि शिवसेना शाखा नेवरे यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी नेवरे ग्रामपंचायत येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. गावकऱ्यांनी या शिबिरात मोठ्या संख्येने सहभाग घेतला. कोरोना रुग्णांना रक्त पुरवठा व्हावा, यासाठी रक्तदान शिबिर घेण्यात आले होते. यावेळी ३४ नागरिकांनी रक्तदान केले. हे रक्त रत्नागिरी शहरातील जिल्हा शासकीय रुग्णालय (सिव्हिल) रक्तपेढीमध्ये पाठविण्यात येणार असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. गावातील नागरिकांसाठी सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली होती. जगभरात कोरोनाचे संकट पसरले असून रुग्णांसाठी रक्ताचा तुटवडा अलीकडे भासू लागला होता. मुंबई, पुण्यासारख्या अति कोरोनाबाधित ठिकाणी रक्त पुरवठा कमी असून याठिकाणी रक्त उपलब्ध करण्याची नितांत गरज आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून काही सामाजिक व सांस्कृतिक संस्थांनी रक्तदान शिबिर ही आयोजित केले होते. कोरोनाग्रस्तांसाठी ‘लालबागचा राजा सार्वजनिक मंडळ’ या गणेश मंडळाने रक्तदान शिबिर आयोजित केले होते.

- Advertisement -