Thursday, August 18, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ देवेंद्र फडणवीस नाम ही काफी है

देवेंद्र फडणवीस नाम ही काफी है

Related Story

- Advertisement -

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ५२ व्या वर्षात पदार्पण झाले आहे. या ५२ वर्षाच्या प्रवासात देवेंद्र यांनी अनेक चढ उतार बघितले. त्यातून तावून आणि सुलाखून निघाल्याने राजकारण काय ते या तरुण तडफदार राजकारण्याला चांगलच माहित आहे.
गेल्या महिन्याभरात शिंदेगटाने केलेल्या बंडाळीमुळे राज्याच राजकारण पुरत ढवळून निघालं. शिवसेना विरुद्ध शिंदेसेना सामना अख्ख्या देशाने बघितला. या सत्तांतरामागे देवेंद्र फडणवीस हेच कलाकार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच जाहीर केले. त्यामुळे स्मितहास्याच्या पलिकडचे देवेंद्र सगळ्या देशालाच कळाले. यामुळे मोदी है तो मुमकीन है प्रमाणेच राज्यात देवेंद्र है तो मुमकीन है असे मिम्सही व्हायरल झाले. पण तेच खरं असून महाराष्ट्राला प्रगतीच्या उंचावर नेण्याची जिद्द बाळगणाऱ्या देवेंद्र यांची आता खरी कसोटी लागणार आहे. पण ते आपल्या चाणाक्ष बु्द्धीने सगळेच अडथळे दूर करतील यात शंका नाही. अशा या तडफदार आणि अजातशत्रू नेत्याला वाढदिवसानिमित्त माय महानगरच्या मन:पूर्वक शुभेच्छा

- Advertisement -