घरव्हिडिओमनसे नेते अमित ठाकरे यांचे सरकारी निवासी डॉक्टरांना खाद्य पदार्थ वाटप

मनसे नेते अमित ठाकरे यांचे सरकारी निवासी डॉक्टरांना खाद्य पदार्थ वाटप

Related Story

- Advertisement -

मनसे नेते अमित राज ठाकरे यांनी राज्यातील डॉक्टरांसाठी हाय प्रोटीन्स युक्त खाद्य पदार्थ मार्ड संस्थेचे अध्यक्ष राहुल वाघ आणि त्यांच्या टीमला दिले. यावेळी राज ठाकरे यांची पत्नी शर्मिला ठाकरे देखील उपस्थित होत्या. याअगोदरही अमित ठाकरे यांनी पीपीई किटस्, मास्क्स, हॉस्पीटल्स बेडशीट आदी साहित्य सरकारी निवासी डॉक्टरांना दिले होते. रुग्णाची कोरोना विषाणूची तपासणी करताना एकदा का तुम्ही पीपीई किटस् चढवले की तुम्हाला ८-१० तास काहीही खाता येत नाही. त्यामुळे यावेळी काम करताना डॉक्टरांना हाय प्रोटीन्सची खूप गरज असते. ही गोष्ट अमित ठाकरे यांना समजताच त्यांनी ४ हजार प्रोटीन्सयुक्त खाद्य पदार्थाचे पॅकेट सरकारी निवासी डॉक्टरांसाठी उपलब्ध करून दिल्या. याबाबत निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेने त्यांचे जाहीर आभार मानले.

- Advertisement -