घरक्रीडा'या' खेळाडूने केला होता तीन वेळा आत्महत्येचा विचार

‘या’ खेळाडूने केला होता तीन वेळा आत्महत्येचा विचार

Subscribe

भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने शनिवारी मोठा खुलासा केला. आपल्या वाईट काळात तीनदा आत्महत्या करण्याचा विचार केला होता, असा खुलासा शमीने केला आहे. शमीवर पत्नी हसीन जहानने घरगुती हिंसाचाराचा आरोप करत २०१८ रोजी गुन्हा दाखल केला होता. यामुळे शमीवर मोठं संकट आलं होतं. त्याच्या करियरला धोका निर्माण झाला होता.

 

View this post on Instagram

 

Hello everyone! Me and @rohitsharma45 coming LIVE tomorrow on Insta LIVE sharp at 8in the evening for a fun chat session! See you!

- Advertisement -

A post shared by Mohammad Shami , محمد الشامي (@mdshami.11) on

- Advertisement -

शमीने त्या घटनेची आठवण करत म्हणाला, “त्यावेळी मला माझ्या आयुष्यातील वैयक्तिक समस्यांना सामोरे जावं लागलं. तुम्ही विश्वास ठेवणार नाही पण त्या वाईट टप्प्यात मी तीन वेळा आत्महत्या करण्याचा विचार केला,” असं रोहित शर्मासमवेत शमीने इन्स्टाग्रामवर लाइव्ह सेशनमध्ये म्हटलं.


हेही वाचा – धोनी नेहमीच मदत करतो, पण प्रश्नाचे पूर्ण उत्तर देत नाही -पंत 


शमी पुढे म्हणाला, ‘माझं कुटुंब माझ्याबद्दल खूपच काळजी करत होतं. मला त्यावेळी क्रिकेटचा विचारही करता आला नाही. तो म्हणाला की त्याचे कुटुंब त्याच्याबरोबर एका खडकासारखे उभं आहे आणि म्हणूनच तो पुन्हा आपल्या पायावर उभा राहू शकला. माझ्या कुटुंबाने मला साथ दिली, माझ्या भावाने मला मदत केली, माझे दोन-तीन मित्र २४ तास माझ्याबरोबर राहत होते. या सर्वांनी मिळून मला क्रिकेटमध्ये परत येण्यास मदत केली.” असं मोहमद शमीने रोहित शर्मासोबत बोलताना सांगितलं.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -