Tuesday, August 9, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ महाराष्ट्राची अधोगती झाली

महाराष्ट्राची अधोगती झाली

Related Story

- Advertisement -

राज्यात कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात आलेले अपयश, कोरोनामुळे झालेले मृत्यू अपुऱ्या वैद्यकीय सुविधांवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जन आशीर्वाद यात्रेनिमित्ताने कोकण दौऱ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जबाबदार ठरवले. राज्याच्या अधोगतीलाही मुख्यमंत्रीच जबाबदार असल्याचे वक्तव्य नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत केले. पण मुख्यमंत्र्यांवर टीका करताना मात्र नारायण राणे यांची जीभ घसरली. अनेकदा मुख्यमंत्र्यांनाच कोणत्या विषयाची माहिती नसते. कोणत्याही विषयाचा त्यांचा अभ्यास नाही. म्हणूनच देशाला स्वातंत्र्य मिळून किती वर्षे झाली हेदेखील त्यांना सहाय्यकाला विचारून सांगावे लागते अशी बोचरी टीका नारायण राणे यांनी केली. पण त्यानंतर मात्र नारायण राणे यांनी मात्र बेताल वक्तव्य करतानाच मी असतो तर मुख्यमंत्र्यांच्या कानाखालीच लगावली असती असे वक्तव्य केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.

- Advertisement -