घरताज्या घडामोडीNarayan Rane VS Shiv Sena: जुहूत शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा

Narayan Rane VS Shiv Sena: जुहूत शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा

Subscribe

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे राज्यातील राजकारण तापलं आहे. तसेच नारायण राणे विरुद्ध शिवसेना तणाव वाढल्याचे दिसत आहे. राज्यातील विविध ठिकाणी नारायण राणे यांच्याविरोधात शिवसैनिकांकडून आंदोलन केले जात आहे. चिपळूणमधील जनआशीर्वाद यात्रेदरम्यान शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने आले होते. आता मुंबईतील जुहूमध्येही शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने आले असून तुफान राडा झाला आहे (shiv sena and bjp party worker aggressive at juhu). यावेळी शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांकडून एकमेकांवर घोषणाबाजी, शिवीगाळ, दगडफेक करण्यात आली. जुहूमधील आंदोलन दरम्यानची परिस्थिती चिघळल्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला आहे.

युवा सेनेचे नेते वरुण देसाई यांच्या नेतृत्वाखाली युवा सैनिकांनी नारायण राणेंच्या जुहू येथील बंगल्याबाहेर आंदोलन केले. यावेळी भाजप कार्यकर्ते देखील उपस्थित होते. यादरम्यान दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांवर दगडफेक केली. तसेच ‘आवाज कोणाचा शिवसेनाचा’, ‘जिंदाबाद जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद’, ‘हमसे जो टकराएगा मिट्टी मे मिल जायेगा’, अशा जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी शिवसेनाच्या कार्यकर्त्यांनी नारायण राणे यांच्या घरात जाण्याचा प्रयत्न केला. तसेच ज्या गाडीत नितेश राणे यांचा फोटो होता ती देखील फोडण्यात आली. अशाप्रकारे परिस्थिती हाताबाहेर गेल्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. यामध्ये शिवसेनेचे काही कार्यकर्ते जखमी झाले आहेत. तसेच या आंदोलनात एक पोलीस अधिकारी जखमी झाला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Narayan Rane VS Shiv Sena: चिपळूणमध्ये शिवसेना-भाजप कार्यकर्ते आमनेसामने


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -