घरव्हिडिओप्रविण दरेकरांनी अनिल देखमुखांना लगावला टोला

प्रविण दरेकरांनी अनिल देखमुखांना लगावला टोला

Related Story

- Advertisement -

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख अखेर आज ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले होते. यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी देशमुखांचा चांगलाच समाचार घेतला आहे. प्रविण दरेकर माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले, ‘तपास यंत्रणापासून दूर जाता येत नाही. पाच-पाच समन्स दिल्यानंतरसुद्धा अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर राहत नव्हते. हायकोर्टात, सुप्रिम कोर्टात दिलासा मिळेल असा त्यांचा प्रयत्न होता. कारवाईला स्थगिती मिळेल, असं त्यांना वाटत होतं. पण कोणत्याच कोर्टानं त्यांना स्थगिती दिली नाही. त्यामुळे त्यांचा नाईलाज झाला. त्यांना आज ईडीसमोर हजर राहण्याशिवाय गत्यंतर नव्हतं.

- Advertisement -